देशभरात अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. २२ जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडेल.
जर तुम्हालाही अयोध्येत (Ayodhya) जाऊन रामाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर हे मंदिर (Temple) लवकरच सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. वेगवेगळ्या राज्यांतून इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास (Travel) अनेकांसाठी कठीण आहे. जर तुम्हालाही रामलल्लाचे दर्शन घ्यायचे असेल तर कमी वेळात पोहचण्यासाठी हे सोप मार्ग ठरतील बेस्ट.
1. ट्रेनने जात असाल तर...
जर तुम्ही ट्रेनने अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सर्वात आधी अयोध्या जंक्शनला जावे लागेल. देशभरात अनेक शहरांमधून येथून अनेक बसेस आणि ट्रेन जातात. याशिवाय लखनौ, दिल्ली, अलाहाबाद, वाराणसी आणि गोरखपूर येथून स्पेशल ट्रेन धावतात. तसेच दूरवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी कनेक्टिंग वाहाने सहज उपलब्ध आहेत.
2. कसे जाल?
दिल्ली ते अयोध्या:
अनेक रेल्वे मार्ग या दोन प्रमुख शहरांना जोडते. या मार्गावरील प्रवासाचा कालावधी हा ७ ते १४ तासांचा आहे. या शहरांसाठी काही वाहनांच्या सुविधा आहेत.
वंदे भारत एक्सप्रेस (आनंद विहार टर्मिनल - अयोध्या कॅन्ट)
कैफियत एक्सप्रेस (रात्रभर)
फरक्का एक्सप्रेस (दिल्ली जंक्शन ते अयोध्या जंक्शन, रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी धावते).
लखनौ ते अयोध्या :
अयोध्येला जाण्यासाठी हा सर्वात छोटा आणि सोपा मार्ग आहे. या ठिकाणावरुन प्रवासाला साधारणत: ३ ते ४ तास लागतात.
वाराणसी ते अयोध्या:
अयोध्येला जाण्यासाठी या ठिकाणावरुन रात्रीच्या वेळी अनेक विशेष गाड्या धावतात. ज्यासाठी साधारणत: ८ ते १० तास लागतात. या मार्गासाठी काही विशेष लोकप्रिय पर्याय आहेत.
जम्मू तवी एक्सप्रेस (वाराणसी ते अयोध्येला ३.५ तासात जोडते)
गंगा सतलज एक्सप्रेस (दोन्ही शहरांना ४.५ तासांत जोडते)
दून एक्सप्रेस (वाराणसी जंक्शनवरून अयोध्या जंक्शनला ३ तास २१ मिनिटांत पोहोचते)
अहमदाबाद साबरमती एक्सप्रेस (वाराणसी ते अयोध्येला ३.५ तासांत जोडते आणि रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी धावते).
3. बसचा प्रवास
उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (UPSRTC)वरुन बस अयोध्या आणि लखनौ, फैजाबाद आणि गोरखपूर येथून नियमितपणे बसेस धावतात. कमी खर्चात अयोध्येला जाण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे. येथे जाण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन बसेस बुक करता येतील. याशिवाय तुम्ही कारने देखील पोहोचू शकता.
4. विमानाचा प्रवास
रस्ते आणि रेल्वेशिवाय तुम्ही विमानाने देखील प्रवास करु शकता. अयोध्येत सध्या विमानतळाचा विकास सुरु आहे. लखनौ चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अयोध्येसाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. या ठिकाणाहून अयोध्येचे अंतर १३० किलोमीटर आहे. या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी टॅक्सी आणि बस सहज मिळतात. तसेच अयोध्येला जाण्यासाठी तुम्ही गोरखपूर, प्रयागराज आणि वाराणसी विमानतळावरुनही जाऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.