Makar Sankranti 2024 Wishes : तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला ! मकर संक्रातीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा हा सण १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. भारतातील प्रत्येक राज्यात या सणाला विविध नावाने ओळखले जाते.
Makar Sankranti 2024 Wishes
Makar Sankranti 2024 WishesSaam tv
Published On

मकर संक्रातीच्या शुभेच्छा in Marathi :

नवीन वर्षातला आणि पौष महिन्यातला सगळ्यात महत्त्वाचा सण मकर संक्रांती. या सणानिमित्त अनेक ठिकाणी आपल्याला पतंग, मांजा, तीळाचे लाडू, पुरण पोळी व इतर अनेक गोष्टी पाहायला आणि चाखायला मिळतात.

यंदा मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) हा सण (Festival) १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. भारतातील प्रत्येक राज्यात या सणाला विविध नावाने ओळखले जाते. आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांती हा सण सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. हा उत्सव वेगवेगळ्या नावाने भारतातील विविध प्रांतात साजरा केला जातो. यादिनानिमित्त तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप (WhatsApp) स्टेटसला मकर संक्रांतीनिमित्त सुंदर स्टेटस ठेवू शकता आणि तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवू शकता.

1. आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम,

गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या..

गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. तीळाची गोडी प्रेमाची माडी माडीचा जिना प्रेमाच्या खूणा मायेचा पान्हा

साऱ्यांच्या मना म्हणूनच एक तीळ सात जना ,

मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti 2024 Wishes
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी घराच्या या दिशेला ठेवा ही वस्तू, पैशांची कमतरता होईल दूर; लखपती व्हाल

3. तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडू

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

4. विसरुनी जा दुःख तुझे हे,

मनालाही दे तू विसावा..

आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा

मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

5. मांजा, चक्री, पतंगीची काटाकाटी, हलवा,

तिळगुळ, गुळपोळी, संक्रांतीची लज्जत न्यारी.

पतंग उडवायला चला रे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti 2024 Wishes
Bhogichi Bhaji Recipe: आजीच्या गावरान पद्धतीने बनवा पौष्टिक-चमचमीत भोगीची भाजी, पाहा रेसिपीचा Video

6. साजरे करू मकर संक्रमण करून

संकटांवर मात हास्याचे हलवे फुटून

तिळगुळांची करू खैरात

संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा !

7. जसे तीळ आणि गुळ तसेच

तू आणि मी येऊन एकत्र,

विसरु सारे बहाणे,

गाऊ मधुर जीवन गाणे

संक्रांतीच्या शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com