Bhogichi Bhaji Recipe: आजीच्या गावरान पद्धतीने बनवा पौष्टिक-चमचमीत भोगीची भाजी, पाहा रेसिपीचा Video

Makar Sankranti Special Bhogichi Bhaji Recipe In Marathi: मकर संक्रांतीचा हा सण१५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. भोगीच्या दिवशी विशेषत: भोगीची भाजी बनवण्याची परंपरा आहे. ही भाजी कशी करायची पाहूया रेसिपी
Bhogichi Bhaji Recipe In Marathi
Bhogichi Bhaji Recipe In MarathiSaam tv
Published On

How To Make Bhogichi Bhaji:

हिवाळ्याचा महिना आणि नववर्षातला पहिला सण मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी भोगीची भाजी ही प्रत्येक घराघरात चाखली जाते.

या काळात अनेक प्रकारच्या भाज्या पाहायला मिळातात. ज्या शरीरासाठी अधिक पौष्टिक असतात. यंदा मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) हा सण१५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. भोगीच्या दिवशी विशेषत: भोगीची भाजी बनवण्याची परंपरा आहे. ही भाजी कशी करायची पाहूया रेसिपी.

1. साहित्य / Ingredients

भोगीची मिक्स भाजी बनवण्यासाठी

  • ओल्या तुरीच्या दाणे - ½ वाटी

  • ओल्या पावट्याचे दाणे - ½ वाटी

  • ओल्या हरभऱ्याचे दाणे - ½ वाटी

  • ओला ताजा मटार - ½ वाटी

  • कच्चे शेंगदाणे - मूठभर

  • गाजर - ¼ वाटी

  • घेवड्याच्या शेंगा - ½ वाटी

  • वांगी - 2 मध्यम

  • बटाटा - 1 मध्यम

  • काशीपुरी बोर - 7/8

  • उसाचे तुकडे - 5/6

  • लसणाच्या (Garlic) पाकळ्या - 12 /15

  • आलं / 1 इंच

  • हिरव्या मिरच्या - 2

  • सुकं खोबरं - 2/3 चमचे

  • पांढरे तीळ - 2 चमचे

  • खसखस- ½ चमचा

  • धणे - ½ चमचा

  • जिरे - ¼ चमचा

  • कोथिंबीर - मूठभर

  • कांदा (Onion) - 1 मधम

  • टोमॅटो - 1 मध्यम

  • तिखट - ½ चमचा

  • गरम मसाला पावडर - ¼ चमचा

  • हळद - ¼ चमचा

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - आवश्यकतेनुसार

  • पाणी - गरजेपुरता

Bhogichi Bhaji Recipe In Marathi
Makar Sankranti 2024 Recipe: तीळ आणि गुळापासून बनवा चविष्ट गोडाचा पदार्थ, लाडू-चिक्कीसाठी बेस्ट पर्याय; पाहा रेसिपी

2. कृती

  • भोगीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम लसूण, हिरवी मिरची, सुके खोबरे, तीळ, खसखस, धणे, जिरे आणि कोथिंबीर घालून पेस्ट तयार करा.

  • कढईत तेल घेऊन वरील सर्व भाज्या घालून मीठ घाला. तेलावर चांगले परतवून घ्या.

  • ताटात परतवलेल्या भाज्या काढून थंड होऊ द्या. त्यानंतर कढईत तेल घेऊन राई, जिरे, कढीपत्ता, कांदा आणि तयार केलेली पेस्ट घालून चांगेल परतवून घ्या.

  • नंतर त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर घालून परतवून घ्या. हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून चांगले परतवून घ्या.

  • मंदआचेवर झाकण ठेवून पेस्ट चांगल्याप्रकारे शिजू द्या. त्यात परतवलेल्या भाज्या घाला. चिमूटभर मीठ घालून मिश्रण परतवून घ्या.

  • त्यानंतर पाणी घालून भाजीला चांगील उकळ काढून घ्या. तयार आहे गावरान पद्धतीची भोगीची भाजी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com