भारतीय नागरिकांना महागाईचा दुहेरी धक्का; एलपीजीनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? कारण आलं समोर

petrol diesel price : भारतीय नागरिकांना महागाईचा दुहेरी धक्का बसलाय. एलपीजीनंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
LPG Price Hike news
petrol diesel priceSaam tv
Published On
Summary

मध्यपूर्वेत कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ

१५ दिवसांत कच्च्या तेलाची किंमत ७३ डॉलरवरून १०३ डॉलर प्रति बॅरेल

कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणच्या युद्धामुळे भारतीय नागरिकांना महागाईचा दुहेरी धक्का बसला आहे. युद्धामुळे भारतात महागाईचा भडका उडाला आहे. एलपीजी गॅस ६० रुपयांनी महागला आहे. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या (crude oil) किंमती वाढल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका उडाला आहे. मागील १५ दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमती ४० टक्क्क्यांनी वाढल्या आहेत. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनीतून होणारी तेल आणि गॅसची सागरी वाहतूक ठप्प झाल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे या मार्गातून कच्चे तेल आणण्यासाठी भारताकडून इराणशी बोलणे सुरू आहे.

युद्ध सुरू होण्याआधी कच्च्या तेलाची किंमत २७ फेब्रुवारी रोजी प्रति बॅरेल ही ७३ डॉलर इतकी होती. त्यानंतर मागील शनिवारी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल १०३ डॉलर इतकी झाली. गेल्या १५ दिवसांत प्रति बॅरेल कच्च्या तेलाची किंमत ३० डॉलरने वाढली आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत ४०.१ टक्क्यांची वाढ ही अवघ्या १५ दिवसांत झाली आहे. त्यामुळे सहाजिकच भारतात येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू शकतात.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर त्यांच्या देशानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. या युद्धामुळे थेट जगातील बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारत आखाती देशातून ६० टक्के कच्चे तेल आयात करतो. युद्धामुळे सागरी वाहतूक ठप्प झाल्यानंतर त्याचा परिणाम थेट भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून कच्चे तेल खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com