High Cholesterol Symptoms google
लाईफस्टाईल

High Cholesterol: कोलेस्टेरॉल वाढण्याच्या महिनाभरआधी दिसतात ही 5 गंभीर लक्षणं, वेळीच व्हा सावध अन्यथा पडेल महागात

Heart Health: हाय कोलेस्टेरॉल हा सायलेंट किलर असून त्वचा, डोळे आणि शरीरातील सूक्ष्म लक्षणांद्वारे तो इशारे देतो. वेळेवर तपासणी केल्यास गंभीर धोका टाळता येतो.

Sakshi Sunil Jadhav

सध्या लोकांच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळतायेत. लोक बाहेरचं खाणं पसंत करतायेत. व्यायाम आणि फीट राहणं हा एक छंद म्हणून केव्हातरी फॉलो करण्याचा प्रयत्न करतायेत. पण यासगळ्याचा तुमच्या शरीरात किती गंभीर परिणाम होतोय, याची कल्पनाच अनेकांना नसते. त्यामध्ये कोलेस्टेरॉल हा एक गंभीर आजार असा आहे, ज्यात तुम्हाला लक्षणे महिनाभर आधीच दिसतात. जी अत्यंत सामान्य असतात. ज्यात फारसा त्रासही होत नाही. पुढे आपण अशाच आजारांबद्दल जाणून घेणार आहोत.

हाय कोलेस्टेरॉलला डॉक्टर सायलेंट किलरचं म्हणतात. कारण याची लक्षणं ओळखणं फार कठीण असतं. मग जेव्हा अचानक कोलेस्टेरॉल वाढतो, तेव्हा उपचार मिळणं कठीण होऊन बसतं. तज्ज्ञांच्या मते हा आजार होण्याची लक्षणे ही वर्षभर आधी सुद्धा दिसायला लागतात. ज्यावर आपण लगेचच उपचार करत नाही किंवा त्यावर उपचार करणं आपल्याला महत्वाचंही वाटत नाही. पुढील लेखात आपण ही लक्षणे जाणून घेऊयात.

हाय कोलेस्टेरॉलची लक्षणे म्हणजे तुम्हाला त्वचेत काही बदल जाणवतात, डोळ्यांमध्ये विचित्र लक्षणं दिसतात, सतत थकवा किंवा हात-पाय रोज दुखतात ही सगळी हाय कोलेस्टेरॉलची लक्षणं असू शकतात. याचा शेवट हा रक्ततपासणीनेच होतो. पण ही सगळी महिनाभर आधी दिसणारी लक्षणे आहेत. जी खूप साधी आणि सामान्य वाटतात.

डोळ्यांच्या पापण्यांच्या आतल्या बाजूला दिसणारे फिकट पिवळसर डाग म्हणजे झँथेलॅझ्मा. हे त्वचेखाली साचलेल्या कोलेस्टेरॉलमुळे तयार होतात. त्याचप्रमाणे, डोळ्याच्या बाहेरील कडेला दिसणारी करड्या-पांढऱ्या रंगाची गोल आकारातली रिंग जी कमी वयातच दिसतात. याला कोलेस्टेरॉलची लक्षणे म्हणतात.

त्वचेवर, विशेषतः कोपर, गुडघे, हात-पायावर दिसणाऱ्या पिवळसर गाठी म्हणजे झँथोमा. या कोलेस्टेरॉलने भरलेल्या गाठी गंभीर लिपिड विकारांच्या संबंधित असू शकतात. हाय कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक साचून तुमच्या हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे थोड्याशा कामानेही दम लागतो, छातीत दुखतं, थकवा किंवा वेदना जाणवतात. जेव्हा मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा अचानक थकवा, बोलण्यात अडचण किंवा दृष्टी धूसर होते अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे वेळेवर तज्ज्ञांकडून उपचार करुन घेणे फायद्याचे राहील.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Cancer Symptoms : घसा अचानक दुखतोय? असू शकतो मानेच्या कॅन्सरचा धोका, वेळीच वाचा लक्षणं

Fort In Panvel : उंच कडे अन् कातळ पायऱ्या; पनवेलजवळ वसलाय 'हा' भव्य किल्ला, प्रत्येक पावलावर अनुभवाल थरार

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी प्रश्न पुरवण्याचा बदल्यात हवालदार यांनी रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासात स्पष्ट

Crime News: खोलीत बोलवून जबरदस्तीने किस, नंतर प्राइव्हेट पार्टला...; बॉक्सिंग कोचचं अल्पवयीन तरुणीसोबत विकृत कृत्य

SCROLL FOR NEXT