Sakshi Sunil Jadhav
थंडीत भजी-पकौड्यांची मजाच वेगळी असते. जर तुम्हालाही सकाळी गरमागरम भजी खाण्याची इच्छा होत असेल, तर पालकाची भजी हा उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो.
थंडीच्या दिवसांत भजी, समोसे यांची क्रेझ वाढते. पालकची भजी चविष्ट तर आहेच, पण शरीरासाठीही फायदेशीर आहे.
पालकात लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. त्यामुळे ही भजी चव आणि आरोग्य दोन्ही देते.
पालक, बेसन, तांदळाचं पीठ, कांदा, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट, धणे पावडर, जिरे, ओवा आणि मीठ इ.
पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरा. कांदा पातळ आणि लांब कापून घ्या.
बेसन, तांदळाचं पीठ आणि सर्व मसाले एकत्र करून त्यात पालक व कांदा मिसळा. थोडं-थोडं पाणी घालून घट्ट पीठ तयार करा.
घोळ जास्त पातळ नसावा. तो पालक आणि कांद्याला व्यवस्थित चिकटला पाहिजे, तेव्हाच भजी कुरकुरी होतात.
कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. थोड्या-थोड्या भज्या टाकून सोनेरी आणि कुरकुरी होईपर्यंत तळा.
गरमागरम पालकाची भजी हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा गरम चहासोबत सर्व्ह करा.