Sakshi Sunil Jadhav
चाणक्य नीती ही आयुष्याला योग्य दिशा देणारी मानली जाते. यश, धन आणि कीर्ती टिकवायची असेल, तर माणसात काही मूलभूत गुण असणं अत्यंत आवश्यक आहे, असं चाणक्य सांगतात.
चाणक्यांच्या मते, विवेक म्हणजे योग्य-अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे. विवेकशील व्यक्ती चुकीच्या मार्गावर जाण्यापासून स्वतःला नेहमी वाचवू शकतो.
लाभ-नुकसान, चांगलं-वाईट आणि सत्य-असत्य यामधला फरक ओळखण्यासाठी विवेक गुण मदत करतो.
जो व्यक्ती न्याय करत नाही, त्याच्यावर समाज विश्वास ठेवत नाही. लोक न्यायप्रिय माणसालाच लोक गांभीर्याने घेतात.
फक्त विवेक असून चालत नाही, तर त्याचा वापर न्यायाच्या चौकटीत करणं महत्त्वाचं आहे.
भीती माणसाला मर्यादित करते. चाणक्यांच्या मते साहस हे यशाचं मुख्य शस्त्र आहे.
नवीन संधी मिळवण्यासाठी आणि नवे मार्ग निर्माण करण्यासाठी साहस आवश्यक आहे.
क्रोध, इच्छा आणि लोभ यावर नियंत्रण नसेल, तर यश टिकत नाही, असं चाणक्य सांगतात.
विवेक, न्याय, साहस आणि संयम हे चार गुण असलेला माणूस कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो आणि समाजात मान-सन्मान मिळवतो.