Sakshi Sunil Jadhav
शहर असो किंवा ग्रामीण भाग, रोजच्या प्रवासासाठी दुचाकी वाहनांवरच लोकांचा जास्त विश्वास असतो. कमी किंमत, उत्तम मायलेज आणि स्वस्त मेंटेनन्समुळे मिडल क्लाससाठी बाईक हा परवडणारा पर्याय ठरतो.
कमी इंधनात जास्त मायलेज देणाऱ्या 100 ते 110cc कम्यूटर बाइक्सची मागणी सातत्याने वाढत आहे. फ्युएल सेव्हिंग, कमी सर्व्हिस खर्च आणि जास्त टिकणारे इंजिन हे यामागचे मुख्य कारण आहे.
TVS Sport मध्ये 109.7cc इंजिन देण्यात आलं आहे. ARAI प्रमाणे ही बाईक 80 kmpl पर्यंत मायलेज देते. प्रत्यक्ष वापरात 70-75 kmpl मायलेज मिळेल. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त ₹55,100 आहे.
बजाज Platina 100 ही DTS-i इंजिनसोबत येते. कंपनीनुसार ही बाईक 75 kmpl मायलेज देते. कमी व्हायब्रेशन, आरामदायी सीट आणि फुल टँकवर 700 किमीपेक्षा जास्त रेंज ही याची मोठी जमेची बाजू आहे. किंमत ₹65,897 पासून सुरू होते.
Hero Splendor Plus मध्ये 97.2cc इंजिन आणि 70 kmpl पर्यंत मायलेज मिळतं. i3S टेक्नॉलॉजीमुळे इंधन बचत होते. कमी मेंटेनन्स, मजबूत इंजिन आणि चांगली रिसेल व्हॅल्यू यामुळे ही बाईक आजही लोकांची पहिली पसंती आहे.
Hero HF Deluxe ही साधी पण टिकाऊ बाईक आहे. ARAI नुसार 68-70 kmpl मायलेज देणारी ही बाईक प्रत्यक्षातही 65 kmpl सहज देते. किंमत फक्त ₹58,770 पासून सुरू होते.
Honda Shine 100 मध्ये 98.98cc इंजिन देण्यात आले असून कंपनी 65 kmpl मायलेजचा दावा करते. Honda ची स्मूदनेस, कमी व्हायब्रेशन आणि दर्जेदार बिल्ड यामुळे ही बाईक शहरातील ट्रॅफिकसाठी उत्तम ठरते.
मागील सर्व बाइक्स हलक्या वजनाच्या असून चालवायला सोप्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, ऑफिसला जाणारे कर्मचारी तसेच डिलिव्हरी बॉय यांच्यासाठी या बाइक्स परफेक्ट ठरतात.
जर तुम्ही कमी बजेटमध्ये जास्त मायलेज, कमी मेंटेनन्स आणि विश्वासार्ह बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या टॉप 5 मायलेज देणाऱ्या बाइक्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.