Health Saam Tv
लाईफस्टाईल

Health News: अपचन, अ‍ॅसिडिटीची समस्या आहे? हे घरगुती उपाय ठरतील प्रभावी

Health : सध्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे खूप आजार होताना दिसत आहेत. जंक फूडमुळे पोटात गॅस होणे, अॅसिडिटी होणे अशा समस्या होतात. यावर काही घरगुती उपाय अंत्यत फायदेशीर असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Homemade Remedy On Acidity Cough:

सध्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे खूप आजार होताना दिसत आहेत. जंक फूडमुळे पोटात गॅस होणे, अॅसिडिटी होणे अशा समस्या होतात. त्यामुळे सूज येते. हिवाळ्यात तळलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त वाढते. त्यामुळे अपचनाच्या समस्या वाढतात. अपचनाची समस्या झाल्यास अनेकदा आपण दुर्लक्ष करतो. परंतु त्यामुळे त्रास जास्त वाढू शकतो. अशा परिस्थितीत घरगुती उपाय प्रचंड फायदेशीर ठरतात.

सध्या जीवनशैलीत खूप जास्त बदल झाला आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या वेळा बदलतात. तसेच अनेक लोक बाहेरचं जंक फूड खातात. यामुळे पोटाचे आजार होतात. अपचन, अॅसिडिटी, छातीत कफ होणे असे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे अशा काळात काळजी घ्यायची असते. या आजारांवर घरातील काही गोष्टी परिणामकारक ठरतात.

हिंग

आयुर्वेदानुसार, हिंग शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. गॅसच्या समस्या दूर करण्यासाठी हिंग खूप चांगले आहे. जेवल्यावर जर तुम्हाला गॅस, अपचनाची समस्या येत असेल तर पाण्यात हिंग मिसळून प्या. जेवणात डाळ किंवा भाजीत हिंगाचा तडका द्या. त्यामुळे गॅसची समस्या नियंत्रणात राहिल.

ओवा

जेवणात ओवा खूप महत्त्वाचा असतो. पोट दुखणे, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यावर फायदेशीर आहे. पोटदुखी असल्यावर ओवा खा. ओवा चावून खा. त्यानंतर त्यावर कोमट पाणी प्यावे. यामुळे पोटदुखीवर झटपट आराम मिळेल.

काळी मिरी

काळी मिरी हा पदार्थ घरात नेहमी वापरतात. काळी मिरी पदार्थ कफवर फायदेशीर आहे. काळी मिरीचे सेवन केल्याने कफ नियंत्रणात राहतो. यासाठी दुधात चिमूटभर काळी मिरी टाका. किंवा गरम पाण्यात काळी मिरी उकळून घ्या. त्याने अपचन, कफ अशा समस्या दूर होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone battery life: मोबाइलची बॅटरी किती टक्के झाल्यावर चार्जिंगला लावावी?

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांच्या खर्चात २० टक्के कपातीचे निर्देश

Curry Leaves Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या कढीपत्त्याचे पाणी; होतील 'हे' भन्नाट फायदे

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT