साम टिव्ही ब्युरो
आपण जेवण करताना ज्या पदार्थांचा वापर करतो. याचगोष्टी तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.
जेवण बनवण्यात वापरले जाणारे मसाले लहानसहान आजारांमध्येसुद्धा उपयोगी पडतात.
कच्चे लिंबू व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा खजिना मानले जाते. हे व्हिटॅमिन सीचे उत्तम स्रोत आहेत.
अस्थमा, टॉन्सिलायटिस आणि गळा खराब होणे यावर लिंबाचे सेवन केल्याने आराम मिळतो.
लिंबू पाण्याने रक्तदाब आणि ताण कमी होतो. लिव्हरसाठी टॉनिक म्हणून काम करतो.
आल्याला महाऔषधसुद्धा म्हणतात. हे ताजे आणि सुके दोन्ही स्वरूपात वापरले जाते.
आला, ओवा, सैंधवमीठ, लिंबाचा रस एकत्र करून खाल्ल्यास पचनक्रिया चांगली राहते.
नियमित ओवा खाल्ल्यास पचनशक्ती चांगली राहते.