Cooking Tips : अचानक गॅस सिलिंडर संपला? कमी गॅसमध्ये कसे शिजवाल पटकन अन्न, फॉलो करा या टीप्स

Less Gas Consumption : जर तुम्ही स्वयंपाकासाठी सिलिंडर वापरत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला अशा स्वयंपाकाच्या युक्त्या सांगत आहोत ज्याद्वारे कमी गॅसमध्येही पूर्ण अन्न शिजवता येते.
Cooking Tips
Cooking TipsSaam Tv
Published On

LPG Gas :

एलपीजी गॅस ही अशी एक गोष्ट आहे जी बहुतेक लोक स्वयंपाकासाठी नियमितपणे वापरतात. परंतु, तरीही बऱ्याच लोकांना ते दीर्घकाळ कसे चालवायचे हे माहित नाही. अशा स्थितीत अनेकवेळा त्यांना स्वयंपाक (Cooking) करताना गॅस सिलिंडर रिकामे होण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तुमच्यासोबत असे होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला कमी गॅस वपरून जेवण बनवण्याची ट्रिक सांगणार आहोत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओल्या भांड्यांमध्ये अन्न शिजवू नका

सिलेंडरमध्ये गॅस (Gas) कमी असेल तर त्यावर कधीही ओली भांडी ठेवू नका, यामुळे गॅस जास्त लागते. अशा स्थितीत गॅस चालू करण्यापूर्वी भांडी कापडाने नीट पुसून कोरडी करा.

Cooking Tips
Cooking Tips : स्वयंपाक बनवण्यात एक्सपर्ट व्हायचंय? मग फॉलो करा आजीच्या या खास टिप्स

झाकून अन्न शिजवा

जर तुम्हाला गॅस वाचवायचा असेल तर अन्न शिजवताना झाकूनच शिजवा. असे केल्याने वाफेमुळे अन्न लवकर शिजते आणि गॅसचा वापर कमी होतो.

प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवा

प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजते. अशा स्थितीत कमी गॅसवर अन्न शिजवायचे असेल तर जास्तीत जास्त कुकरचा वापरा.

Cooking Tips
Cooking Tips: जेवण बनवताना छोट्या-छोट्या चुका टाळा; अन्यथा तुम्ही बनवलेलं जेवण अंगी लागणार नाही

अन्न मोठ्या प्रमाणात शिजवा

तुमचा गॅस संपणार असेल तर डाळी, भाज्या यांसारख्या अधिक गोष्टी एकाच वेळी शिजवणे आणि उरलेले अन्न नंतरसाठी फ्रीजमध्ये ठेवणे चांगले पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com