Cooking Tips: जेवण बनवताना छोट्या-छोट्या चुका टाळा; अन्यथा तुम्ही बनवलेलं जेवण अंगी लागणार नाही

Cooking Mistakes : आजकाल प्रत्येक व्यक्ती स्वता:ला फिट ठेवायच्या प्रयत्नात आहे.
Cooking Mistakes
Cooking MistakesSaam Tv
Published On

Cooking Mistakes :

जेवण बनवताना प्रत्येक गृहिणीसमोर स्वादिष्ट जेवण बनवणे हे खूप आव्हानात्मक काम असते. परंतु टेस्टी जेवण बनवण्याच्या नादात अनेकदा त्यातील पौष्टिकता टिकवता येत नाही. त्यामुळे बर्‍याच वेळा घरातील जेवण खाल्यानंतरही आपल्या शरीराला पाहिजे ते घटक मिळत नसल्याचे आपल्याला जाणवते. बर्‍याचदा आपण वेगळ्या पद्धतीने अन्न शिजवताना चवीसोबत पोषक तत्वांचा देखील विचार करावा, त्यामुळे आपल्या आरोग्यावरही फरक दिसेल.

आजकाल प्रत्येक व्यक्ती स्वता:ला फिट ठेवायच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आपण बाहेरचे अन्न टाळतो आणि घरच्या जेवणाला पसंती देतो. परंतु असं असूनही नेहमी आरोग्याशी संबंधित कोणत्या ना कोणत्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. जर आपल्या सोबत असं होत असल्यास , त्यामागे जेवण बनवण्याची अयोग्य पद्धत असू शकते. होयं आपल्याला यावर विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे.

Cooking Mistakes
World Cup 2023 Streaming: वर्ल्डकप कमी पैशात कुठे आणि कसा पाहता येईल; मोबाईल, टीव्हीसाठी किती खर्च होईल? वाचा सविस्तर

लवकर जेवण शिजवण्याच्या आणि जेवणाच्या चवीकडे भर देण्याच्या नादात, आपण अशा अनेक चुका करतो, ज्यामुळे अन्न शिजवताना बहुतेक पौष्टिक घटक नष्ट होतात. ज्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात पोषण तत्वे मिळत नाहीत. अन्न शिजवताना कोणत्या चुका टाळल्या गेल्या पाहिजेत यावर एक नजर टाकूया.

भाज्या एका आकारात न कापणे

भाजी कापताना योग्य पद्धतीन त्या कापणे महत्त्वाचे असतो. भाजी कापताना ती एका आकारात कापण्याकडे भर द्यावा. कमी-जास्त आकारात भाजी कापली तरी शिजणारच आहे, असा विचार करणे योग्य नाही. कारण भाजी एका आकारात न कापल्यास त्यातीत जीवनसत्वे कमी होतात. भाजी कमी जास्त आकारात कापल्यास भाजी योग्य पद्धतीने शिजत नाही. तुम्ही हेल्दी कुकिंग ऑइल भाज्यांसाठी वापरलं तरी त्यामुळे आरोग्याला विशेष फायदा होत नाही, असा तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

भाज्या जास्त आचेवर शिजवा

जेवण लवकर शिजावे यासाठी आपण ते मोठ्या आचेवर शिजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र स्वयंपाकाचा हा नियम सर्व भाज्यांना लागू होत नाही. कारण अनेक भाज्यांना शिजण्यासाठी बारीक आचेची गरज असते. तसे न केल्यास त्या भाजीमधले पोषक तत्वे कमी होतात. दुसरं म्हणजे, अनेक वेळा आपण भाज्या झाकण न ठेवता शिजवतो.

जी की एक चांगली पद्धत आहे. भाज्या झाकून शिजवल्या तर त्यातून बाहेर पडणारे पाणीच भाज्या शिजण्यास मदत करतात. पण मोठ्या आचेवर ते पाणी निघून जाते आणि नंतर त्यात जास्तीचे पाणी घालून शिजवाव्या लागतात, जो आरोग्यासाठी चांगले नाही.

Cooking Mistakes
Dyson Zone Headphone : बापरे! बाईकएवढीच हेडफोनची किंमत; असं काय आहे स्पेशल? | Dyson Zone Headphone

हेल्थ एक्सपर्टच्या म्हणण्यानूसार, विशिष्ट भाज्यांना शिजवण्याच्या आधी थोड्याच प्रमाणात उकळण्याची गरज असते. यात ब्रोकोलीसह कोबीचा समावेश आहे. ही पद्धत योग्य असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा आपण या पद्धतीचा वापर करतो त्यावेळी भाज्यांचा रंग आणि चव दोन्ही कायम राहतात.

कढईत किंवा कुकरमध्ये भाज्या शिजवल्यास त्यातीत जीवनसत्त्वे देखील नष्ट होण्याची शक्यता जास्त असते. अशा पद्धतीने भाजी शिजवल्यास व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम जवळजवळ नष्टच होतात. त्यामुळे जेवण बनवतानाच्या काही छोट्या चुकी टाळल्यास भाज्यांमधील पोषक तत्वे पूर्ण तुम्हाला मिळू शकतील.

Cooking Mistakes
Jio Recharge Plans: Jio ने लॉन्च केले 3 जबरदस्त प्री-पेड प्लानसह मोफत OTT सबस्क्रिबशन, आता एंटरटेंटमेंट होणार डबल!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com