रिलायन्स जिओ सध्या सर्वाधिक वापरकर्ते असलेली देशातील टॉप असलेली टेलिकॉम कंपनी आहे. जिओ ग्राहकांसाठी उत्तम बेनिफिट्ससह प्लान्स देण्यासाठी आधीपासूनच देशभरात प्रसिद्ध आहे.
रिलायन्स जिओने तीन नवीन प्री-पेड प्लान (Plan) लॉन्च केले आहेत. या तिन्ही वार्षिक रिचार्ज योजना आहेत. म्हणजे, तुम्हाला तिन्ही प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता मिळेल. तसेच, या प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, मोफत डेटा आणि एका वर्षासाठी SonyLiv आणि Zee5 चे सबस्क्रिप्शन मिळेल.
Jio 3662 प्लान
या प्री-पेड प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2.5GB डेटा दिला जात आहे. तसेच, अमर्यादित 5G डेटा (Data) आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा दिली जात आहे. या सर्व प्लानमध्ये SonyLiv आणि Zee5 चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. तसेच, Jio TV, Jio Cinema, Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते. दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर, 4G नेटवर्कवर वेग 64kbps होतो.
Jio 3226 रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2GB 4G डेटासह अमर्यादित 5G डेटा दिला जात आहे. तसेच, दररोज 100 एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय JioTV, SonyLiv, JioCinema आणि JioCloud चे मोफत (Free) सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
Jio 3225 रुपयांचा प्लान
हा प्लॅन 3226 रुपयांच्या प्लानपेक्षा 1 रुपया कमी आहे. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंगसह 5G डेटासह दररोज 2GB डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. हा प्लान SonyLiv आणि Zee5 सबस्क्रिप्शनसह येतो.
Jio 1999 रुपयांचा प्लान
जर तुमचे बजेट कमी असेल, तर रु. 1,999 प्लान तुमच्यासाठी एक पर्याय असू शकतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग ऑफर केले जात आहे. याशिवाय दररोज 2.5 GB डेटा आणि 100 SMS ची सुविधा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.