Maharashtra Milk Price Issue: दूधदर मैलांवर बदलतात, दुध उत्पादक शेतक-यांचा कोल्हार- घोटी मार्गावर रास्ता रोको

काही शेतक-यांनी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
maharashtra milk price issue
maharashtra milk price issueSaam tv
Published On

- सचिन बनसाेडे / विश्वभूषण लिमये

Nagar News :

दुध दर प्रश्नी आज (गुरुवार) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे जनसंघर्ष‌ संघटना तसेच दुध उत्पादक शेतक-यांनी कोल्हार - घोटी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन (kolhar ghoti highway rasta roko andolan) केले. यामुळे परिसरातील वाहतुक काही विस्कळीत झाली. (Maharashtra News)

दुधाला 34 रुपये दर द्यावा, पशू खाद्याचे दर 25 टक्के कमी करून जीएसटी हटवावी, सरकारी आणि खाजगी दुध संघाचे ऑडीट करावे तसेच तीन महिन्यातील दुध दरातील फरक शेतक-यांना द्यावा अशा विविध मागण्यासांठी शेतक-यांनी आंदोलन छडेले. त्यानंतर काही शेतक-यांनी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

maharashtra milk price issue
Mla Sangram Jagtap: आमदार संग्राम जगताप मंगळवारी बसणार उपाेषणास, प्रशासनास दिला इशारा; जाणून घ्या कारण

दूधदर मैलांवर बदलतात

सांगली आणि कोल्हापुरात गाईच्या दुधाला लिटरला ३३ रुपये, सातारा आणि पुण्यात ३१ रुपये तर सोलापूर जिल्हात मात्र २६ रुपये दर मिळत आहे. एकाच गुणवत्तेच्या दुधाला दर मात्र वेगवेगळा दिला जात असताना ठरवून दिलेला प्रति लिटर ३४ रुपयांचा विसर राज्य शासनाला पडला आहे की काय असे चित्र सध्या महाराष्ट्रात निर्माण झालं आहे.

या घसरणाऱ्या दरांमुळे शेतकऱ्यांचे मरण होत असताना शासनाचा अंकुश राहिला नसल्याने दरात फरक करण्याचे धाडस खासगी दूध संघांकडून होत आहे. त्यामुळे याचा पूर्ण फटका सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याला बसतो आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

maharashtra milk price issue
Aaditya Thackeray In Kokan: वाचाळवीरांना आपण दाखवून दिले! काेकण दाै-यातील खळा बैठकीत पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी वाढविला कार्यकर्त्यांचा उत्साह (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com