- विनायक वंजारे
मुंबई, कोकण पदवीधर निवडणूकीत आपला विजय निश्चित आहे. आपण जिंकताेय याचा अर्थ आता आराम करायचा नाही तर आणखी मेहनत घेऊन त्यावर शिक्कामाेर्तब करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवायचे आहेत असा सल्ला सेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आजपासून सुरु झालेल्या त्यांच्या काेकण दाै-यात कार्यकर्त्यांना दिला. (Maharashtra News)
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आजपासून (गुरुवरा) कोकण दौरा सुरू झाला. या दौऱ्यात ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या गाठी भेटी घेत आहेत. त्यांच्या समवेत खासदार विनायक राऊत (mp vinayak raut), आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.
दोडामार्ग पासून ते महाड असा ठाकरेंचा दौरा असून खळा बैठका ही नवीन संकल्पना ते राबवणार आहेत. कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सोबत चहापान व जेवणाचा आस्वाद ते घेणार असल्याचे पदाधिका-यांनी सांगितले. दोडामार्ग येथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मुंबई, कोकण पदवीधर निवडणूकीची तयारी करीत आहोत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणुक असेल. घराेघरी जाऊन पदवीधर शाेधा. त्यांची नाेंदणी करा. विजय आपला निश्चित असला तरी मेहनत घ्या असा सल्ला ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी खासदार विनायक राऊत यांनी प्रत्येक निवडणुकीत विराेधकांना धडकी भरेल असे मते वाढताहेत. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांत यश आपलेच आहे असे म्हटले. काही वाचाळवीर नेत्यांना आपण यापूर्वी देखील दाखवून दिले आहे असे म्हटले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा काेकण दाैरा करुन कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा उत्साह वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.