Weak Cotton Prices Hit Ginning Units: कापसाच्या कृत्रिम टंचाईमुळे महाराष्ट्रातील जिनिंग उद्योग ठप्प; तीन लाख कामगारांवर उपासमारीची वेळ

सरकारने तात्काळ तोडगा काढून शेतकऱ्यांना कापसाला योग्य हमीभाव द्यावा अशी मागणी हाेत आहे.
scarcity of cotton 500 ginning industries closed in maharashtra
scarcity of cotton 500 ginning industries closed in maharashtra saam tv
Published On

Buldhana News :

कापसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सध्या तरी कापूस साठवणुकीवर भर दिला आहे. त्यामुळे कापूसच बाजारात नसल्याने एकेकाळी राज्याचा वैभव असलेला कापूस व जिनिंग उद्योग सध्या ठप्प आहे. शेतकरी कापूस विकत नसल्याने जिनिंग उद्योगासाठी लागणारा कच्चामाल बाजारातच उपलब्ध नसल्याने राज्यातील साडेपाचशे पैकी पाचशे जिनिंग उद्योग (ginning industries) हे सध्या बंद पडला आहे. (Maharashtra News)

गेल्या वर्षी कापसाला सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळत होता व याही वर्षी तोच भाव असल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. गेल्या वर्षीचा चाळीस ते पन्नास टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात साठवून ठेवलेला आहे. याही वर्षी कापसाचा 70 टक्के हंगाम संपला असून शेतकऱ्यांच्या घरात कापूस आलेला आहे.

प्रतिक्विंटल दहा हजार रुपयांपेक्षा अधिक भाव अपेक्षित

कापसाला खाजगी व्यापारी सहा ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देत असल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी बाजारात आणत नाही. कापूस उत्पादनासाठी प्रतिक्विंटल यापेक्षा खर्च लागत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दहा हजार रुपयांपेक्षा अधिक भाव अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकरी कापूस विक्रीस आणत नाही व योग्य भावाची प्रतीक्षा करत शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलेला आहे असे खूद्द शेतक-यांनीच साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.

scarcity of cotton 500 ginning industries closed in maharashtra
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी निमित्त बोंबल्या विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी; देहू, आळंदीसह शेगावात भक्तांचा लाेटला सागर

उद्योगासाठी लागणाऱ्या कच्चामालाची टंचाई

शेतकरी उद्योग समूहाचे व्यवस्थापक रुपेश बकाल यानी साम टीव्हीशी बाेलताना गेल्या दोन वर्षापासून जिनिंग उद्योग ठप्प असल्याने अनेक जिनिंग उद्योग हे तोट्यात जात आहेत. त्याचं कारण म्हणजे जिनिंग बंद असलं तरी विद्युत पुरवठा, सुरक्षा खर्च, इतर मेंटेनन्स यासाठी जिनिंगला खर्च लागतच आहेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्चामाल म्हणजे कापसाला योग्य हमीभाव शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी जिनिंग उद्योगातील सर्वांची असल्याचे स्पष्ट केले.

तीन लाख कामगारांवर उपासमारीची वेळ

कापूस आणि जिनिंग उद्योग हे एकेकाळी राज्याचं वैभव होतं. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या परिसरात कापसाची लागवड आणि उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत असतं. त्यामुळे याच परिसरात मोठ्या प्रमाणात जिनिंग उद्योग आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात एकूण 550 जिनिंग उद्योग असून यावर जवळपास तीन लाख कामगार आपली पोटाची खळगी भरत असतात. मात्र गेल्या दोन वर्षापासून जिनिंग उद्योग ठप्प असल्याने राज्यातील तीन लाख कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने यावर तात्काळ तोडगा काढून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव कापसाला मिळाला पाहिजे याच्या हालचालींवर भर देण्याची आवश्यकता आहे.

Edited By : Siddharth Latkar

scarcity of cotton 500 ginning industries closed in maharashtra
Mahabaleshwar Starwberry Rate: शेतकरी चिंतेत, महाबळेश्वरच्या लाल चुटूक स्ट्रॉबेरीचा दर घटणार; जाणून घ्या कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com