mahabaleshwar strawberry price may slash know the reason
mahabaleshwar strawberry price may slash know the reasonMahabaleshwar News saam tv

Mahabaleshwar Starwberry Rate: शेतकरी चिंतेत, महाबळेश्वरच्या लाल चुटूक स्ट्रॉबेरीचा दर घटणार; जाणून घ्या कारण

राज्यात महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वाधिक स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते.
Published on

Mahabaleshwar News :

सातारा जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊ लागले आहे. याचा परिणाम स्ट्रॉबेरी फळावर दिसू लागला आहे. वातावरणात बदल नाही झाल्यास कमी कालावधीत लहान आकाराचीही स्ट्रॉबेरी पक्व होऊन उत्पादनात वाढ होऊन दरात घट होण्याची शक्‍यता असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. (Maharashtra News)

mahabaleshwar strawberry price may slash know the reason
Kolhapur News: स्वाभिमानीच्या बालेकिल्ल्यात राजू शेट्टींच्या विरोधात शेतकरी एकवटले, नेमकं काय घडतयं काेल्हापुरात

राज्यात महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वाधिक स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. तालुक्‍यात गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासून स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाला. सुरवातीस दरही चांगले मिळाले होते.

यंदा बदलत्या वातावरणामुळे स्ट्राॅबेरी अडचणीत आल्याचे बाेलले जात आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी महाबळेश्वरसह पाचगणी, जावलीत ढगाळ वातावरण आहे. यामुळे स्ट्रॉबेरी फळावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साधारणपणे स्ट्रॉबेरीला आठ ते दहा अंश सेल्सिअस तापमान फायदेशीर ठरते. तापमान कमी झाल्यास फळे चिरडण्याची किंवा आकारने लहान राहण्याची शक्‍यता असते. त्यातच ढगाळ वातावरण होऊ लागल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता वाढली आहे.

Edited By : Siddharth Latkar

mahabaleshwar strawberry price may slash know the reason
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात उद्या सोडले जाणार? हस्तक्षेप अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com