टक्कलपणा हृदयविकाराचा संभाव्य इशारा असू शकतो.
केस गळणे फक्त आनुवंशिक कारणांमुळे होत नाही.
रक्ताभिसरणातील बिघाड केस गळण्यास कारणीभूत ठरतो.
अनेक जण अचानक वाढलेल्या गळतीमुळे आणि टक्कल पडण्याने त्रस्त असतात. यावेळी केवळ सौंदर्याशी निगडित समस्या मानून दुर्लक्ष केलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का की, अचानक पडणारं टक्कल हे हृदयाच्या आरोग्याशी संबंधित असू शकतं? डॉक्टरांचे म्हणणं आहे की, केस गळणं आणि हृदयविकाराचा झटका यांचा थेट संबंध आहे.
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिमल छाजेड यांच्या मते, केस अचानक गळणं हे फक्त हार्मोन्समधील बिघाड किंवा आनुवंशिक कारणांमुळे होत नाही. संशोधनात असं आढळून आलं आहे की टक्कल आणि हृदयविकाराचा धोका हे एकमेकांशी जोडलेले आहेत. ज्यांना अचानक केस गळून टक्कलपणाची समस्या निर्माण होते, त्यांच्यात हृदयविकाराची शक्यता जास्त असते.
जर तुमचे केस अचानक गळून टक्कलपणात बदलत असतील तर तो शरीरात होणाऱ्या रक्ताभिसरणातील बिघाडाचा संकेत असू शकतो. ज्यावेळी हृदय योग्य प्रकारे रक्तपुरवठा करू शकत नाही तेव्हा टाळूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन आणि पोषणद्रव्य पोहोचत नाहीत. त्यामुळे केस झपाट्याने गळू लागतात.
अस्वस्थ आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपान यांचा परिणाम केवळ हृदयावरच होत नाही तर अकाली केस गळतीवरही होतो. विशेषतः ३० वर्षांनंतर जर केस गळतीची समस्या झपाट्याने वाढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
जर अचानक केस गळती वाढली असेल, तर त्वरित त्वचारोगतज्ज्ञ आणि हृदयरोगतज्ज्ञ यांची सल्लामसलत घ्यावी.
रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि साखरेची पातळी तपासून घ्यावी.
दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करावा आणि संतुलित, पौष्टिक आहार घ्यावा.
धूम्रपान आणि मद्यपान यापासून दूर राहावे.
वेळीच काळजी घेतल्यास केवळ केस गळतीवर नियंत्रण ठेवता येतं असं नाही तर हृदयविकाराचा धोका टाळताही येतो. आरोग्यदायी आहार, सकारात्मक जीवनशैली आणि नियमित आरोग्य तपासणी हीच सर्वात मोठी गरज आहे. याशिवाय नेमकी समस्या काय आहे हे ओळखता येणार नाही.
टक्कलपणा हृदयविकाराशी कसा संबंधित आहे?
टक्कलपणा रक्ताभिसरणातील बिघाडाचे लक्षण असू शकतो.
केस गळण्याचे खरे कारण काय आहे?
हृदयाच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे केस गळू शकतात.
३० वर्षांनंतर केस गळती का गंभीर मानली जाते?
त्यामागे हृदयविकाराचा धोका असू शकतो.
केस गळती वाढल्यास कोणत्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा?
त्वचारोगतज्ज्ञ आणि हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी काय करावे?
आरोग्यदायी आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी करावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.