Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Early signs of a stroke: पक्षाघात म्हणजेच स्ट्रोक ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा अचानक थांबतो किंवा कमी होतो. यामुळे मेंदूच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळत नाहीत आणि त्या काही मिनिटांतच मरू लागतात.
Stroke warning signs
Stroke warning signssaam tv
Published On
Summary
  • स्ट्रोकमध्ये मेंदूपर्यंत रक्तपुरवठा खंडित होतो.

  • अचानक तीव्र डोकेदुखी स्ट्रोकचा इशारा असू शकतो.

  • सतत येणाऱ्या उचक्या महिलांमध्ये स्ट्रोकचे लक्षण असू शकतात.

स्ट्रोक म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये मेंदूपर्यंत पोहोचणारा रक्तपुरवठा थांबतो किंवा मेंदूतील एखादी रक्तवाहिनी फुटू लागते. अशा वेळी मेंदूचे नुकसान होण्याची शक्यता असते. मुख्य म्हणजे याचा शरीराच्या काही भागांवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो किंवा गंभीर परिस्थितीत मृत्यू देखील होऊ शकतो.

कोणत्याही गंभीर आजारांचे संकेत शरीर आपल्याला देत असतं. त्याचप्रमाणे स्ट्रोक येण्याआधी देखील शरीर तुम्हाला संकेत देऊ लागतं. अशावेळी शरीर जे संकेत देतं ते ओळखणं फार महत्त्वाचं आहे. हे बदल कोणते आहेत ते जाणून घेऊया.

अचानक आणि तीव्र डोकेदुखी

जर कोणत्याही कारणाशिवाय तीव्र आणि सहन न होणारी डोकेदुखी होत असेल तर ते स्ट्रोकचं संकेत असू शकतं. ही डोकेदुखी सामान्य वेदनांपेक्षा वेगळी वाटते. मेंदूत रक्ताचा गाठ तयार झाल्यास अशा प्रकारची वेदना जाणवते.

सतत येणाऱ्या उचक्या

सतत आणि न थांबणाऱ्या उचक्या देखील स्ट्रोकचं लक्षण असू शकतात. तज्ज्ञांच्या मते हे लक्षण विशेषत: महिलांमध्ये जास्त आढळतं. मेंदूतील मेडुला हा भाग श्वासोच्छ्वास आणि गिळण्याचं काम नियंत्रित करतो. या भागावर परिणाम झाल्यास उचक्या थांबत नाहीत.

मळमळ आणि उलट्या

स्ट्रोकपूर्वी शरीरात ताण वाढल्यामुळे ‘कॉर्टिसोल’ आणि ‘अ‍ॅड्रेनालिन’ हे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रक्तदाब आणि शुगरमध्ये असंतुलन असलेल्या व्यक्तींमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. या बदलांमुळे मेंदूत दाब वाढतो आणि मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.

Stroke warning signs
Early signs of heart inflammation: हृदयाला सूज आल्यास सुरुवातीला शरीरामध्ये दिसतात ७ मोठे बदल; दुर्लक्ष करणं बेतू शकतं जीवावर

छातीत वेदना

हृदयविकाराच्या झटक्यात जशी छातीत तीव्र दाबाची भावना येते. यावेळी छातीत जळजळ, आवळल्यासारखं वाटणं किंवा अस्वस्थता जाणवू शकते. मेंदूतल्या रक्तवाहिनीत गुठळी तयार झाल्यामुळे रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे असं लक्षण दिसू शकतं.

मानसिक गोंधळ

अचानक बोलताना अडचण येणं, नेहमीच्या गोष्टी आठवायला त्रास होणं किंवा काही काळासाठी स्मरणशक्ती गोंधळलेली वाटणं हे लक्षण हलक्यात घेऊ नका. हे स्ट्रोक येण्याचं महत्वाचं पूर्वलक्षण असू शकतं.

Stroke warning signs
Inflamed heart symptoms: हृदयाला सूज आल्यावर शरीरात दिसतात हे मोठे बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या

चेहरा किंवा हात-पाय सुन्न होणं

स्ट्रोकपूर्व अवस्थेत चेहऱ्यावर लोंबकळल्यासारखं होणं, ओठ वाकडे होणं, हात किंवा पायात अचानक अशक्तपणा येणं किंवा सुन्न होणं अशी लक्षणं दिसतात. कारण स्ट्रोकमध्ये मेंदूचा तो भाग प्रभावित होतो जो स्नायूंचं नियंत्रण आणि समन्वय साधतो.

Stroke warning signs
Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा
Q

स्ट्रोकचे मुख्य कारण काय आहे?

A

मेंदूपर्यंत रक्तपुरवठा थांबणे किंवा रक्तवाहिनी फुटणे हे स्ट्रोकचे मुख्य कारण आहे.

Q

अचानक तीव्र डोकेदुखी कोणत्या आजाराचा इशारा असू शकते?

A

अचानक तीव्र डोकेदुखी स्ट्रोकचा पूर्व इशारा असू शकते.

Q

सतत उचक्या येण्याचे मुख्य कारण काय आहे?

A

मेंदूतील मेडुलावर परिणाम झाल्यामुळे सतत उचक्या येतात.

Q

स्ट्रोकपूर्वी मळमळ किंवा उलट्या का होतात?

A

मेंदूत दाब वाढल्यामुळे मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.

Q

चेहरा किंवा हात-पाय सुन्न होण्याचे कारण काय आहे?

A

मेंदूचा स्नायू नियंत्रणाचा भाग प्रभावित झाल्यामुळे सुन्नता येते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com