Janmashtami Special Gopalkala Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Janmashtami Prasad Recipe: जन्माष्टमीनिमित्त घरच्याघरी बनवा गोपाळकाला; वाचा सिंपल रेसिपी

Ruchika Jadhav

भारतात गोकुळाष्टमीला फार महत्व आहे. या दिवशी श्रीकृष्ण देवाचा जन्म झाला असं म्हटलं जातं. संपूर्ण भारतात या दिवशी जन्माष्टमीनिमित्त उत्तव आणि जल्लोष पाहायला मिळतो. अनेक परिसरांमध्ये उंच दहीहंडी बांधल्या जाजात अनेक तरुण मुलं आणि मुली एकत्र येत या हंड्या फोडतात. श्री कृष्णाचा जन्मदिवस असल्याने या दिवशी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. बाळकृष्णला सर्वात आवडणारा पदार्थ म्हणजे गोपाळकाला.

गोपाळकाला दरवर्षी याच दिवशी बनवला जातो. सर्व व्यक्ती प्रसादासाठी सुद्धा हाच पदार्थ खातात. घरातील सर्व महिला एकत्र येऊन ही रेसिपी बनवतात. त्यामुळे याची चव देखील फार मस्त लागते. अशात काही महिलांना किंवा नवीनच पदार्थ बनवण्यासाठी शिकत असलेल्या मुलींना हवा तसा गोपाळकाला बनवता येत नाही. त्यामुळे आज या बातमीमधून त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

साहित्य

  • जाड पोहे – अर्धा कप

  • दही – अर्धा कप

  • मीठ – चवीनुसार

  • साखर – अर्धा चमचा

  • मुरमुरे – अर्धा कप

  • ज्वारीच्या लाह्या – अर्धा कप

  • चना डाळ – दोन चमचे

  • तूप – एक चमचा

  • जिरे – अर्धा चमचा

  • हिंग – चिमूटभर

  • हिरवी मिरची – एक बारीक चिरलेली

  • आले – अर्धा चमचा

  • डाळिंब – एक चमचा

  • काकडी – एक चमचा बारीक चिरलेली

  • ओलं खोबरं – एक चमचा

  • कोथिंबीर – बारीक चिरलेली

रेसिपी

सर्वात आधी पोहे एका भांड्यात काढून घ्या. पोहे छान स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्या आणि त्याच भांज्यात काहीवेळ झाकून ठेवा. त्यानंतर तुम्ही दह्याची तयारी करून घ्या. दही शक्यतो गोड आणि काल रात्री विरझन लावून ठेवलं असेल असंच घ्या. दह्यामध्ये थोडं मीठ आणि साखर टाकून दही छान फेटून घ्या. फेटलेल्या दह्यात तुम्ही जे पोहे धुवून ठेवलेत ते मिक्स करून घ्या.

पुढची स्टेप अगदी सोप्पी आहे. दही आणि पोह्यांच्या मिश्रणामध्ये मुरमुरे,ज्वारीच्या लाह्या,चना डाळ, डाळिंब, काकडी, ओलं खोबरं आणि कोथिंबीर हे सर्व त्यामध्ये मिक्स करून घ्या. चना डाळ किमान चार तास तरी आधी पाण्यात भिजवलेली असावी. हे सर्व मिश्रण छान मिक्स केल्यावर याची चव अप्रतिम लागते.

पुढे फोडणीची तयारी करा. त्यासाठी कढईत थोडं तेल किंवा तूप घ्या. त्यानंतर यात जिरे, हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरचा आणि अर्धा चमचा बारीक किसलेले आलं एक एक करून अॅड करा. कडक फोडणीसाठी तूप किंवा तेल चांगलं तापवून घ्या. ही फोडणी दह्याच्या मिश्रणात मिक्स करा. तयार झाला टेस्टी गोपाळकाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT