DINKs trend and Gen Z saam tv
लाईफस्टाईल

DINKs trend: Gen Z तरूणींमध्ये ‘नो किड्स’ ट्रेंडची निवड वाढली, फर्टिलिटी अवेअरनेसही ठरतोय महत्वाचा घटक

Gen Z women fertility awareness: अलीकडेच झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की, या पिढीतील महिला आपल्या प्रजनन क्षमतेबद्दल (Fertility) अधिक जागरूक आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

मदरहुड हॉस्पिटल्स आणि नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीने देशभरात विविध शहरांमधील जेन-झी पिढीमध्ये त्यांच्या प्रजनन आरोग्याबाबत नुकतेच सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये विविध व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या २३ ते ३० वयोगटातील २०० हून अधिक जेन झी तरूणी या सर्वेक्षणात सहभागी झाल्या होत्या. भारतातील निम्म्याहून अधिक जेन झी तरूणींना वाटतं की, पस्तीशीनंतर प्रजनन क्षमता लक्षणीयरीत्या कमी होते.

या निष्कर्षांवरून भारतातील जेन झी तरूणी प्रजनन आरोग्य, मुल होण्याची अचूक वेळ आणि प्रजनन पर्यायांबाबत माहिती आहे हे स्पष्ट होतं. ३५ वर्षांनंतर प्रजननक्षमतेत लक्षणीय घट होते हे निम्म्याहून अधिक तरूणी मान्य करतात. तर ४१% मुली या प्रजनन आरोग्याबाबत माहितीकरिता प्राथमिक स्रोत म्हणून सोशल मीडियाचा वापर करतात.

सर्वेक्षणातून काय समोर आलं?

२३ ते ३० वयोगटातील महिलांवर केलेल्या सर्वेक्षणात, असं आढळून आलं की, २८ ते ३२ या वयोगटातील ४०% महिला गर्भधारणेसाठी प्रयत्न सुरू करत आहेत. सर्वेक्षणात सहभागी महिलांना गर्भधारणेचं योग्य वय विचारलं असता २५% महिलांनी वयाच्या पस्तीशीच्या आत गर्भधारणा होणं गरजेचं आहे असं स्पष्ट केलंय.

या सर्वेक्षणातून असं आढळून आलं की, ३५% महिलांना एएमएचबाबत माहिती आहे, जी महिलांमधील प्रजननक्षमता दर्शवणारी एक प्रमुख चाचणी आहे. १०% महिलांनीच एएमएच चाचणी केल्याचं निदर्शनास आलं. अंडाशयात असलेले अँटी-मुलेरियन हार्मोन हे महिलांमध्ये स्त्रीबीजांचं प्रमाण दर्शवतात. हे एका साध्या रक्त चाचणीद्वारे समजू शकते. ६५% महिलांना या चाचणीविषयी फारशी माहिती नाही असं आढळून आलं. तर ५१% जेन झी तरूणींना वाटतं नियमित आरोग्य तपासणीमध्ये प्रजनन क्षमता तपासणंही तितकंच गरजेचं आहे.

५६% महिलांनी एग फ्रीझिंगबद्दल ऐकले आहे, परंतु त्यांना त्याबद्दल पुरेशी माहिती नाही. १०% लोक आर्थिक स्थिरता, करिअर, जगाचा प्रवास करणं आणि योग्य जोडीदार न सापडणं यासारख्या जीवनातील इतर प्राधान्यांमुळे या पर्यायाचा विचार करू इच्छितात.

सोशल मीडिया हे लैंगिक आरोग्य, मासिक पाळीचं आरोग्य आणि स्त्रीरोग समस्या या सारख्या विषयांवर चर्चा करतात. पीसीओएस आणि लठ्ठपणामध्ये वाढ होत असल्याची माहिती प्रजनन तज्ञांनी दिली आहे. लग्नास उशीर झाल्याने गर्भधारणेचे वय वाढत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

बेंगळुरूच्या सर्जापूरमधील मदरहूड हॉस्पिटल्समधील कन्सल्टंट-फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. शर्वरी मुंढे सांगतात की , सर्वेक्षणात असंही दिसून आलं की २०% महिलांमध्ये पीसीओएस, थायरॉईड आणि एंडोमेट्रिओसिस सारख्या आजारांचे निदान झालं आहे. तरीही त्यांना वैद्यकीय मदत घेण्याची चिंता भासत नाही. हृदयाच्या आरोग्याप्रमाणेच प्रजनन आरोग्यातही जीवनशैली ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. एग फ्रीझिंग हा एक व्यवहार्य पर्याय असला तरी, तो केव्हा आणि का विचारात घ्यावा याबाबत आजही पुरेशी जागरूकता नाही.

पुण्यातील बाणेरमधील नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या डॉ. रश्मी निफाडकर सांगतात की, हळूहळू वय आणि प्रजनन क्षमता याबद्दल महिला वर्गात जागरूकता वाढत आहे. सर्वेक्षण अहवाल असं सूचित करतात की, भारतीय महिलांच्या अंडाशयांचं वय कॉकेशियन महिलांच्या तुलनेत सहा वर्षे वेगाने वाढतं. गंभीर बाब म्हणजे २० ते ३० वयोगटातील महिलांमध्ये एएमएच पातळीत घट दिसून येते. सर्वेक्षणात असे नमूद केलंय की, ६५% महिलांना त्यांच्या एएमएच पातळी बद्दल माहिती नाही.

प्रजनन क्षमतेत घट हळूहळू होते परंतु सर्वात लक्षणीय घट ही पस्तीशीनंतर होते. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी म्हणून नियमित प्रजनन चाचणी नियमित करून आपण तरुणींना प्रजनन आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करु शकतो. एग फ्रिजींगचे योग्य वय जाणून घेणं महत्वाचं आहे. या सर्वेक्षणात असंही नमूद केलंय आहे की, २७% महिला आर्थिकदृषट्या स्थिरावण्यासाठी गर्भधारणेस विलंब करतात.

DINKS कपल्सची संख्या वाढतेय

सध्या रिलेशनशिपमध्ये 'DINKs कपल’ चा ट्रेंड पाहायला मिळतोय. 'DINKs Couple' म्हणजे Dual Income No Kids. नोकरी अथवा व्यवसाय करणारी जोडपी जी लग्नानंतर फॅमिली प्लॅनिंगचा कोणताही विचार नाही. त्यांच्यासाठी DINK या शब्दाचा वापर केला जातो. १८% जेन झी तरूणींनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रजननक्षमतेचा परिणाम स्त्री आणि पुरुष असा दोघांवरही होतो. या सर्वेक्षणात जेन झी तरूणी प्रजननक्षमतेच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला असला तरी, वंध्यत्वाचा परिणाम स्त्री आणि पुरुष असा दोघांवरही सम प्रमाणात होतो आणि महिलांमधील वंधत्वाप्रमाणेच पुरुषांमधीस वंध्यत्व देखील गर्भधारणेत अडथळा निर्माण करते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला या ४ ठिकाणी लावा दिवा, लक्ष्मी अन् पितर दोन्ही होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update: नांदेडच्या मुखेड शहरात भीषण अपघात, 7 ते 8 जण गंभीर

Shocking : पत्नीला अंघोळ करताना तरुणाने पाहिलं, व्हिडीओ बनवून पती विषारी औषध प्यायला अन् पुढे...

बस झालं ना दादा... अजित पवारांसामोरच धनंजय मुंडे संतापले | VIDEO

SCROLL FOR NEXT