Liver Cancer Symptoms: शरीराच्या 'या' भागातील वेदना सांगतात लिव्हर कॅन्सर झालाय; चुकूनही दुर्लक्ष करू नका

Liver cancer pain location: शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे यकृत (Liver). ते रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करते आणि पचनास मदत करते. परंतु, काही वेळा चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा इतर कारणांमुळे यकृताला कर्करोग होऊ शकतो.
Liver cancer pain location
Liver cancer pain locationsaam tv
Published On
Summary
  • पोटाच्या उजव्या भागातील वेदना लिव्हर कॅन्सरचे लक्षण असू शकते.

  • सतत थकवा आणि वजन कमी होणे धोक्याची लक्षणे आहेत.

  • हेपेटायटिस B आणि C लिव्हर कॅन्सरची मुख्य कारणे आहेत.

आपल्या शरीरात अनेकदा असे काही वेदना होतात, ज्या आपण साध्या समजून दुर्लक्षित करतो. कधी पोटात जडपणा, कधी थकवा तर कधी कमरेत किंवा पोटाच्या मधोमध हलका त्रास जाणवतो. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ते गंभीर आजारांचे संकेत ठरू शकतात.

डॉक्टरांनी सांगितलं की, जर पोटाच्या उजव्या बाजूस सतत वेदना होत असतील तर हा लिव्हर कॅन्सरचा (Liver Cancer) इशारा असू शकतो.

शरीराच्या कोणत्या भागात होते वेदना?

लिव्हर कॅन्सरच्या सुरुवातीला रुग्णाला साधारणतः पोटाच्या उजव्या वरच्या भागात वेदना जाणवतात. या वेदना सतत राहू शकतात किंवा मध्येच वाढू शकतात. काही वेळा हा त्रास पाठीपर्यंत किंवा खांद्यापर्यंत पसरतो.

लिव्हर कॅन्सरची इतर लक्षणं

  • सतत थकवा जाणवणं

  • विनाकारण वजन कमी होणं

  • भूक मंदावणं

  • कावीळ (त्वचा व डोळे पिवळसर होणं)

  • पोटात सूज किंवा जडपणा

  • वारंवार मळमळ किंवा उलटी होणं

Liver cancer pain location
Why Do We yawn when Someone Is yawning |एखाद्याला जांभई देताना बघून तुम्हाला ही जांभई येते का?

कोणत्या कारणांमुळे वाढतो लिव्हर कॅन्सरचा धोका?

  • दीर्घकाळ मद्यपान करणं

  • हेपेटायटिस B आणि C व्हायरसचा संसर्ग

  • फॅटी लिव्हरची समस्या

  • लठ्ठपणा आणि असंतुलित आहार

  • धूम्रपान व चुकीची जीवनशैली

Liver cancer pain location
Why Do Ants Walk In A Line: मुंग्या या नेहमी एका सरळ रेषेतच का चालतात?

लिव्हर कॅन्सरपासून कसा बचाव कराल?

  • मद्यपान आणि धूम्रपान करणं टाळा

  • संतुलित आणि पोषक आहार घ्या

  • नियमितपणे लिव्हरची तपासणी करा

  • हेपेटायटिस B लस नक्की घ्या

  • वजन नियंत्रणात ठेवा व दररोज व्यायाम करा

Liver cancer pain location
Hearing Skills: हे खरं आहे का? पुरुषांपेक्षा महिलांची ऐकण्याची क्षमता अधिक; संशोधनातून कारण आलं समोर

लिव्हर कॅन्सर हा गंभीर आजार आहे परंतु वेळेत लक्षणं ओळखली तर उपचार शक्य आहेत. जर पोटाच्या उजव्या बाजूस सतत वेदना होत असतील किंवा वर सांगितलेली लक्षणं दिसत असतील, तर ती किरकोळ समजून दुर्लक्षित करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Liver cancer pain location
Severe period cramps: काही महिलांना मासिक पाळीत तीव्र वेदना का होतात? रिसर्चमधून उलगडलं कारण
Q

लिव्हर कॅन्सरचे प्राथमिक लक्षण कोणते?

A

पोटाच्या उजव्या वरच्या भागात सतत वेदना.

Q

लिव्हर कॅन्सरचा धोका वाढवणारे मुख्य घटक कोणते?

A

मद्यपान, हेपेटायटिस बी/सी, फॅटी लिव्हर.

Q

लिव्हर कॅन्सरपासून बचावासाठी कोणती लस घ्यावी?

A

हेपेटायटिस बी ची लस घ्यावी.

Q

लिव्हर कॅन्सरच्या रुग्णांना नेहमी कोणता त्रास जाणवतो?

A

सतत थकवा आणि वजनात घट.

Q

पोटातील वेदनांकडे दुर्लक्ष का करू नये?

A

ती लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची इशारा असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com