Hearing Skills: हे खरं आहे का? पुरुषांपेक्षा महिलांची ऐकण्याची क्षमता अधिक; संशोधनातून कारण आलं समोर

Women hear better than men: महिलांना पुरुषांपेक्षा जास्त ऐकू येतं असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर...पण हे खरं आहे. नुकत्याच केलेल्या संशोधनातून हे समोर आलं आहे.
Hearing Skills
Hearing Skillssaam tv
Published On

आपल्या शरीरात विविध अवयव असून त्यांचं कार्यही वेगळं आहे. यामध्ये डोळे, कान, नाक यांचं काम वेगळं असतं. कानांद्वारे तु्म्ही समोरच्या व्यक्तीने साधलेला संवाद ऐकू शकता. किंवा कोणतीही गोष्ट ऐकू शकता. याचाच अर्थ कानाने तुम्ही ऐकण्यास सक्षम असता. पण तुम्हाला माहितीये का पुरुषांपेक्षा महिलांना जास्त ऐकू येतं.

आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की, महिला, पुरुष किंवा लहान मुलं यांना सारखंच ऐकू येतं. मात्र नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार, महिलांमध्ये सामान्यतः पुरुषांपेक्षा चांगली श्रवण क्षमता असते. आता यामागील वैज्ञानिक कारण काय आहे ते जाणून घेऊया.

Hearing Skills
Chicken Cancer Risk : सावधान! चिकन खाल्ल्यानं कॅन्सर होत असल्याचं संशोधनातून उघड

स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त का ऐकू शकतात?

संशोधकांनी १३ देशांमध्ये हा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये त्यांनी सरासरी, महिलांमध्ये पुरुषांपेक्षा सुमारे दोन डेसिबल जास्त ऐकण्याची क्षमता असते. संशोधकांचं असं म्हणणं आहे की, महिलांची श्रवण क्षमता पुरुषांपेक्षा चांगली असू शकते. याचं कारण म्हणजे त्यांच्या कानातील 'कॉक्लीया' नावाच्या भागाची रचना वेगळी असते.

Hearing Skills
Blockages in arteries: शरीरातील रक्तवाहिन्या बंद झाल्यास पायांमध्ये सकाळी दिसतात 'हे' मोठे बदल, कसे कराल उपाय

कॉक्लीया म्हणजे नेमकं काय?

सामान्य भाषेत सांगायचं झालं तर, कॉक्लिया हा द्रवपदार्थाने भरलेला एक लहान अवयव आहे जो ध्वनी लहरींना सिग्नलमध्ये रूपांतरित करतो. या ध्वनी लहरी मेंदूमध्ये प्रसारित केल्या जाऊ शकतात जेणेकरून मेंदू त्यांना समजू शकेल. लहानपणापासून वाढताना शरीरात होणारे हार्मोनल बदल तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेत हा फरक निर्माण करू शकतात, असंही तज्ज्ञांचं मत आहे.

Hearing Skills
Paresh Rawal: लघवी पिऊन बरं झाल्याचा अभिनेते परेश रावल यांचा दावा; खरंच युरीन पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

जरी चांगली/उच्च श्रवण क्षमता फायदेशीर असली तरी, खूप आवाज असलेल्या ठिकाणी ही गोष्ट त्रासदायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, महिलांना झोपेचा त्रास होऊ शकतो. इतकंच नाही तर हृदयाशी संबंधित काही समस्या देखील असू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com