
चिकन तंदूर, चिकन लॉलीपॉप, बटर चिकन....ही नावं एकूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना...चिकन म्हणलं की काहींना जेवणाचे दोन घास जास्त जातात. अनेकदा प्रश्न विचारला जातो की, आरोग्यासाठी वेज की नॉनवेज काय योग्य? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्यक्ती त्याच्या हिशोबाने वेगळं देतो.
आपल्या आरोग्यासाठी वेज की नॉनवेज काय योग्य याबाबत अनेक रिसर्च देखील करण्यात आले आहेत. यामध्ये काहींमध्ये प्लांट बेस्ट फूड्स, काहींमध्ये आयर्न आणि प्रोटीन असल्याने नॉनवेज आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, दररोज चिकन खाणाऱ्या व्यक्तींची चिंता वाढवली आहे.
नव्या रिसर्चनुसार असं सांगण्यात आलं आहे की, तुमच्या दररोजच्या जाएटला बँलन्स ठेवा. जेणेकरून तुमच्या आरोग्याचं अधिक नुकसान होणार आहे. यामध्ये चिकन खाणाऱ्या व्यक्तींना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
इटलीतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजीच्या अभ्यासकांनुसार, जास्त प्रमाणात चिकन खाणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. ज्या व्यक्ती आठवड्याला ३०० ग्रामपेक्षा अधिक प्रमाणात चिकन खातात त्यांना पोट आणि आतंड्यासंदर्भातील आजार आणि कॅन्सरता धोका वाढतो.
संशोधनकांना असंही समजलं की, जास्त प्रमाणात चिकन खाल्ल्याने Gastrointestinal Cancer चा धोका वाढतो. त्यांनी २० वर्षांपर्यंत ४८६९ इतक्या व्यक्तींच्या डेटाचा अभ्यास केला. यावरून त्यांना लोकं जास्त चिकन खातात असं जाणवलं. तर या लोकांना अकाली मृत्यूचा धोकाही असल्याचं समोर आलं.
चिकनचं सेवन प्रमाणात करावं
चिकन चांगलं शिजवावं
दररोजच्या आहारात फळं, भाज्य आणि फायबरची मात्रा वाढवावी
प्रोसेस्ड मीट किंवा डीप फ्राय चिकन अतिप्रमाणात खाऊ नये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.