Heart health: तुमच्या 'या' चुकांमुळे धोक्यात येतंय हृदयाचं आरोग्य

Health Tips: आजकाल तरूण वयात देखील हृदयाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. हृदयाचं आरोग्य सांभाळायचं असल्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे ते या आर्टिकलमधून जाणून घ्या.
Heart Health
Heart Healthfreepic
Published On

हृदयाला जपा असं डॉक्टरांकडून नेहमी सांगण्यात येतं. यासाठी आपण पथ्य पाळतो, दररोज व्यायाम करतो. चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयाचं आरोग्य धोक्यात येतं. मात्र फक्त य़ाच गोष्टींमुळे नव्हे तर इतर गोष्टींमुळे देखील हृदयाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे हृदयाला हानिकारक ठरणाऱ्या इतर गोष्टी देखील जाणून घेतल्या पाहिजेत.

या गोष्टींमुळे हृदयाचं आरोग्य धोक्यात येतं

हिरड्यांच्या समस्या

ज्या व्यक्तींना हिरड्यांच्या समस्या असतात त्यांना हृदयाचे आजार होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हिरड्यांच्या समस्यांमुळे दातात जंतू तयार होतात. हे जंतू शरीरातील रक्तात मिळून हृदयाला तसंच हृदयाच्या रक्तवाहिन्यांना धोकादायक ठरू शकतात. यासाठी दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

Heart Health
IBS: इरिटेबल बाऊल सिंड्रोम म्हणजे नेमकं काय? पचनसंस्थेशी संबंधित समस्येबाबत काय आहेत गैरसमज?

शिफ्टमध्ये काम केल्याने

प्रमाणापेक्षा जास्त काळ काम केल्याने हृदयावर ताण येतो आणि हृदयाच्या समस्या उद्भवतात. कॅनडातील वेस्टन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार, शिफ्टमध्ये काम केल्याने शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. ज्यामुळे हृदयाला धोका निर्माण होतो. जर तुम्ही दररोज ठरलेले तास काम करत नसाल तर कमीत कमी व्यायाम, संतुलित आहार आणि नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

अकाली रोजनिवृत्ती

जर महिलांना वेळेच्या आधी म्हणजे वयाच्या 46व्या वर्षी जर रजोनिवृत्ती आली तर त्या महिलांना हृदयाच्या आजारांचा मोठा धोका असतो. शिवाय अशा महिलांना स्ट्रोक येण्याचा धोकाही दुप्पट असतो. हृदयाचे आजार संभवण्याचं कारण म्हणजे रजोनिवृत्ती नंतर महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी होते. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्यस महिलांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Heart Health
Sunscreen Frequency : एका दिवसात किती वेळा सनस्क्रीन लावली पाहिजे? सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धतही जाणून घ्या

स्लिप अॅप्निया

जर तुम्ही रात्री झोपेत मोठ्याने घोरत असाल तर तुम्हाला स्लिप अॅप्निया ही समस्या असण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, स्लिप अॅप्निया या समस्येचा संबंध हा हृदयाचे ठोके, स्ट्रोक आणि हार्ट फेल होण्याशी असतो. मात्र स्लिप अॅप्नियावर वेळीच उपचार केल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते.

Heart Health
Type 5 diabetes: सडपातळ लोकांनाही नकोसा असलेला नवा डायबिटीस, काय आहे टाईप-5?

चांगली झोप न मिळणं

जेव्हा तुम्ही 6 तासांपेक्षा कमी झोप घेता त्यावेळी तुम्हाला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता असते. आणि हे दोन्ही गंभीर आजार हृदयाच्या आजाराशी निगडीत आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अधिकवेळ झोपू शकता. कारण जास्त काळ झोपल्याने स्ट्रोकचा धोका संभवतो. त्यामुळे माणसाने केवळ 9 तास झोप घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com