IBS: इरिटेबल बाऊल सिंड्रोम म्हणजे नेमकं काय? पचनसंस्थेशी संबंधित समस्येबाबत काय आहेत गैरसमज?

Irritable bowel syndrome: आयबीएस ही दीर्घकालीन स्थिती आहे, परंतु जीवनशैलीतील बदल, आहार आणि औषधोपचारांनी ती व्यवस्थापित केली जाऊ शकते. मोठ्या संख्येने लोक आयबीएसशी झुंजत आहेत परंतु या स्थितीशी संबंधित चुकीच्या माहितीमुळे बऱ्याच व्यक्तींना याविषयी फारशी माहिती नाही.
Irritable bowel syndrome
Irritable bowel syndromesaam tv
Published On

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) हा एक सामान्य विकार आहे, जो मोठ्या आतड्याला प्रभावित करतो. त्यामुळे पोटदुखी, पोट फुगणे, गॅस आणि आतड्यांसंबंधी समस्या जसे की अतिसार, बद्धकोष्ठता किंवा दोन्ही लक्षणे एकत्र उद्भवतात. आयबीएसचे नेमके कारण माहित नाही, परंतु ते तणाव, काही ठराविक पदार्थ, संसर्ग किंवा आतड्यांतील बॅक्टेरियामुळे होऊ शकते.

गैरसमज - आयबीएस हा एक मानसिक विकार आहे

सत्यता - बरेच लोक असे मानतात की आयबीएस हा एक मानसिक विकार आहे. मात्र हे चुकीचे आहे. आयबीएस हा एक आतड्यांचा विकार आहे जो आकड्यांवर परिणाम करतो. यामुळे आतड्यांच्या हालचालीत बदल होतो.

Irritable bowel syndrome
Cancer: सायलेंट किलर मानले जातात 'हे' ४ कॅन्सर; कोणत्याही लक्षणाशिवाय शरीर पोखरतात, वेळीच बदल ओळखा

गैरसमज- आयबीएसवर कोणताही उपचार नाही

सत्यता- आयबीएसवर कोणताही ज्ञात उपचार नसला तरी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार, व्यायाम, तणावाचे व्यवस्थापन, प्रोबायोटिक्स आणि फायबर सप्लिमेंट्स रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात. औषधांचे योग्य डोस आणि वैद्यकिय सल्ल्याने उपचाप महत्वाचे आहेत.

Irritable bowel syndrome
Toothpaste News : तुमच्या टूथपेस्टमध्ये विष आहे का? नव्या रिसर्चमधून धक्कादायक बाब समोर

गैरसमज- आयबीएस हे लॅक्टोज् इनटॉलरन्स (Lactose Intolerance) सारखेच असते

सत्यता- हे ज्ञात सत्य आहे की लॅक्टोज् इनटॉलरन्स म्हणजे शरीर दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी नैसर्गिक साखर, लॅक्टोज पूर्णपणे पचवता येत नाही. त्यामुळे गॅस आणि पोटात वेदना होणे यासारख्या पचनासंबंधी समस्या उद्भवतात. काही ठराविक पदार्थ आयबीएसची लक्षणे वाढवू शकतात. म्हणून या लक्षणांचे विशिष्ट कारण समजून घेणे गरजेचे आहे.

गैरसमज- आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन वाढविल्यास आयबीएसचे व्यवस्थापन करता येते

सत्यता- फायबरयुक्त आहार ही आयबीएसची लक्षणे आहेत जसे की पोट फुगणे, पोटदुखी आणि गॅसेसची समस्या कमी करू शकते परंतु तो कायस्वरुपी उपचार नाही. डॉक्टरांनी दिलेल्या उपचार मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फक्त भरपूर फायबरयुक्त आहाराचे सेवन केल्याने ही स्थिती बरी होणार नाही हे लक्षात असू द्या.

Irritable bowel syndrome
Male Fertility: टेन्शन, लाईफस्टाईल, लठ्ठपणा; पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर कसा होतो परिणाम?

आयबीएसला कसा प्रतिबंध कराल?

मुंबईच्या झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. ऋषिकेश मालोकर म्हणाले की, आयबीएसचे व्यवस्थापन करण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करणे, कॅफिनयुक्त पदार्थ टाळणे, मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळणे तसेच एकाच वेळी पोटभर न जेवता थोड्या थोड्या अंतराने खात राहणे योग्य राहिल. नियमित व्यायाम आणि योग किंवा ध्यानासारख्या क्रिया देखील तणावमुक्त राहण्यास मदत करु शकतात. शरीर हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. तुम्हाला जाणवणाऱ्या लक्षणांची नोंद करण्यासाठी फुड डायरी तयार करा आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com