
दिवसेंदिवस वाढत्या स्पर्धांमुळे तणावाची पातळी वाढत आहे त्याचबरोबर लठ्ठपणा, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि वाढत्या पर्यावरणीय प्रदूषणामुळे पुरुषांच्या वंध्यत्वाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. हे घटक शुक्राणूंची गुणवत्ता, हार्मोनल संतुलन आणि प्रजनन आरोग्यावर दुष्परिणाम करतात. गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या २५-३५ वयोगटातील जोडप्यांमध्ये वंध्यत्व हा चिंतेचा विषय ठरला आहे.
पुण्यातील नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीमधील फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. निशा पानसरे यांनी सांगतिलं की, वंध्यत्व हे पुरुष आणि महिला असे दोघांनाही प्रभावित करते. पुरुष वंध्यत्वाचा अर्थ म्हणजे पुरुषाच्या प्रजनन प्रणालीतील समस्या आहेत ज्यामुळे तो त्याच्या जोडीदारासोबत यशस्वीरित्या गर्भधारणा करू शकत नाही. चुकीची जीवनशैली, पर्यावरणीय घटक आणि आरोग्याशी संबंधित समस्या हे पुरुष वंध्यत्वास कारणीभूत ठरतात.
वाढत्या ताणतणावाच्या पातळीसह, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या चुकीच्या सवयींमुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. शिवाय, लठ्ठपणा आणि फास्ट फूडचे वारंवार सेवन यासह आहाराच्या चुकीच्या निवडी पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत घट होण्यास हातभार लावतात. पर्यावरणीय प्रदूषण आणि कीटकनाशक आणि जड धातूंशी येणाऱ्या संपर्कामुळे शुक्राणूंची गुणवत्ता धोक्यात येते.
हार्मोनल असंतुलन, मधुमेह आणि संसर्ग यासारख्या काही वैद्यकीय परिस्थिती देखील पुरुष वंध्यत्वात कारणीभूत ठरतात. वाढते वय हे देखील वंधत्वास कारणीभूत ठरते कारण वय वाढत असताना शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. म्हणून, वेळीच निदान आणि व्यवस्थापन हे पुरुषांसाठी महत्त्वाचे आहे .
डॉ. निशा पुढे सांगतात की, दोन महिन्यांत, २५ ते ३५ वयोगटातील ५ ते ६ पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी झाल्याची तक्रार आढळून आली आहे, ज्यामुळे त्यांना अझोस्पर्मिया होतो आणि त्यांना गर्भधारणेसाठी प्रजनन उपचारांसाठी सल्ला दिला जातो. पुरुष वंध्यत्वाचे निदान करण्यासाठी तपशीलवार वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी आणि शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि आकार तपासण्यासाठी वीर्य विश्लेषणाचा समावेश होतो.
लक्षणांमध्ये लैंगिक इच्छा मंदावणे, वृषणात वेदना किंवा सूज आणि हार्मोनल समस्या यांचा समावेश असू शकतो. इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) ही एक प्रभावी उपचारपद्धती आहे, जिथे गर्भधारणेसाठी प्रयोगशाळेत शुक्राणूंनी अंडी फलित केली जातात. शुक्राणू गोठवणे (क्रायोप्रिझर्वेशन) हे कमी शुक्राणूंची संख्या असलेल्या पुरुषांसाठी किंवा इतर उपचार घेत असलेल्या पुरुषांसाठी प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.