Obesity: तरूणांनो, वजन नियंत्रणात ठेवा नाहीतर...! भविष्यात हिप रिप्लेसमेंटचा धोका वाढण्याचा डॉक्टरांचा इशारा

Obesity may causes of Hip replacement: आजकाल अनेक मुलांमध्ये वजन वाढीची समस्या दिसून येते. तरूण वयात देखील ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतेय. मात्र ही समस्या तुमच्या भविष्यातील जीवनासाठी धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
Hip replacement
Hip replacementsaam tv
Published On

२० ते २७ वयोगटातील तरुणांनी आपला वजनाचा काटा नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. या टप्प्यावर वजन वाढणं किंवा लठ्ठपणा हा भविष्यात हिप रिप्लेसमेंटचा धोका वाढवू शकतो. एव्हॅस्कुलर नेक्रोसिस (AVN) सारख्या हिप समस्या टाळणे, वजन नियंत्रित राखणे आणि आपल्या आरोग्याला विशेष प्राधान्य देणे हे तरुणांसाठी अतिशय गरजेचे आहे.

पुण्यातील जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ आशिष अरबट यांनी सांगितलं की, बैठी जीवनशैली, डेस्क जॉब आणि वाढत्या तणावामुळे तरुणांमध्ये नितंबाचे दुखणे वाढले आहे. तरुण वयातील लठ्ठपणामुळे हिप जॉइंटला नुकसान होण्याचा धोका वाढतो ज्यामुळे एव्हॅस्कुलर नेक्रोसिस (AVN) होतो आण रक्तपुरवठ्याअभावी हाडांच्या ऊती मृत पावतात. उपचार न केल्यास, एव्हॅस्कुलर नेक्रोसिसमुळे वेदना, हलचालींवर मर्यादा आणि 35 ते 40 वर्षांच्या आसपास हिप रिप्लेसमेंटची गरज भासू शकते.

Hip replacement
Arthritis: गुडघ्याच्या संधिवाताने त्रस्त आहात? समस्येच्या टप्प्यांनुसार कसे करावेत उपचार?

लठ्ठपणा आणि एव्हीएनमधील परस्पर संबंध

लठ्ठ व्यक्तींना एव्हॅस्कुलर नेक्रोसिस (AVN) चा सामना करावा लागू शकतो. शिवाय, जास्त वजनामुळे हिप जॉइंट्सवर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे हाडांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो. रक्ताभिसरणाच्या या कमतरतेमुळे हाडांच्या ऊती मृत पावतात आणि सांधेदुखी तसेच सांध्यामध्ये कडकपणा येऊ शकतो. उपचार न केलेले एव्हीएनकरिता हिप रिप्लेसमेंटची आवश्यकता भासू शकते, ज्यामुळे संबंधीत व्यक्तीसाठी वजन व्यवस्थापन गरजेचे ठरते.

सध्या एव्हीएनग्रस्त व्यक्तींसाठी SuperPATH हिप रिप्लेसमेंट ही एक प्रभावी तंत्र उपलब्ध झाले आहे. या कमीत कमी आक्रमक प्रक्रियेसाठी चिरफाड करावी लागत नाही. यामध्ये सांधे विस्कळीत न होता किंवा आजूबाजूच्या स्नायू आणि स्नायुबंधाचे नुकसान न होता हिपची नैसर्गिक रचना जपली जाते. म्हणूनच, रुग्णांना रक्तस्त्राव कमी होतो, रुग्णालयात रहाण्याचा कालावधी कमी होतो आणि जलद बरे होता येते. बहुतेक लोक शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी कोणत्याही अस्वस्थतेशिवाय चालू शकतात आणि कोणत्याही आव्हानांशिवाय त्यांच्या दैनंदिन कामांना सुरुवात करु शकतात.

Hip replacement
Toothpaste News : तुमच्या टूथपेस्टमध्ये विष आहे का? नव्या रिसर्चमधून धक्कादायक बाब समोर

तरुणांनी वजन नियंत्रित राखा

संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे आपले शरीरर निरोगी राखण्यास मदत करते. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, जंक फुड, तेलकट, हवाबंद डब्यातील पदार्थ आणि शर्करायुक्त पदार्थांचे सेवन टाळा. तुमच्या नितंबाचे सांधे हिप सांधे मजबूत आणि लवचिक रहावेत यासाठी पोहणे, सायकलिंग आणि योगासारखे व्यायाम करा.

Hip replacement
हेअर स्पा म्हणजे काय? कशी केली जाते याची प्रक्रिया?

स्वतःहून कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. कामाच्या ठिकाणी असताना आणि जास्त वेळ बसण्याऐवजी नियमित विश्रांती घ्या. वेदना आणि स्नायुंचा कडकपणा दूर करण्यासाठी चालणे आणि स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरू शकते. वेळेवर उपचार केल्याने एव्हीएनची स्थिती गंभीर होण्यापासून रोखता येते. भविष्यात हिप रिप्लेसमेंट सर्जरीची शक्यता कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com