Arthritis: गुडघ्याच्या संधिवाताने त्रस्त आहात? समस्येच्या टप्प्यांनुसार कसे करावेत उपचार?

Arthritis: गुडघ्याचा संधिवात हा वाढत्या वयानुसार, भूतकाळातील दुखापती किंवा सांध्यावर येणाऱ्या ताणामुळे उद्भवू शकतो. जोखीम घटकांमध्ये लठ्ठपणा, कौटुंबिक इतिहास आणि वाढते वय कारणीभूत ठरते. सांधेदुखी, हालचाल मंदावणे आणि चालण्यास त्रास होणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत.
Arthritis
Arthritissaam tv
Published On

गुडघे हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचे सांधे असतात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण गुडघ्यांचा खुप वापर करत असतो. आपले गुडघे आपल्या शरीराचा संपुर्ण भार सांभळतात त्यामुळे गुडघे निरोगी राहणे अधिक गरजेचे आहे. गुडघ्याचा संधिवात ही एक सर्वसामान्यपणे आढळणारी समस्या आहे. ही एखाद्याच्या गतिशीलतेवर आणि शारीरीक हालचालींवर परिणाम करते. गुडघ्याच्या संधिवाताने ग्रासलेल्या व्यक्तींकरिता या लेखाच्या माध्यमातून तज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत.

पुण्यातील जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट यांनी सांगितलं की, गुडघ्याच्या सांध्यातील कूर्चा कालांतराने कमी होतो तेव्हा गुडघ्याचा संधिवात होतो, ज्यामुळे वेदना होणे, सूज येणे आणि स्नायुंचा कडकपणा अशा समस्या उद्भवतात. गुडघ्याच्या संधिवाताचे मुख्य प्रकारांमध्ये ऑस्टियोआर्थरायटिस, संधिवात आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक संधिवात यांचा समावेश आहे.

गुडघ्याच्या संधिवाताचे टप्पे

पहिला टप्पा(सुरुवातीचा)

या सुरुवातीच्या टप्प्यात, गुडघ्यातील कूर्च्याची झीज होऊ लागतो. लांब अंतर चालल्यानंतर किंवा शारीरिक हालचालींनंतर अस्वस्थता जाणवू शकते.

Arthritis
मधुमेही रूग्णांनी ब्लड शुगर दिवसातून किती वेळा तपासावी?

दुसरा टप्पा (सौम्य)

रुग्णांना जास्त वेळ चालल्यास किंवा उभे राहिल्यावर वेदना जाणवू शकतात आणि स्नायुंमध्ये कडकपणा येऊ शकतो. सांध्यातील कूर्च्याची झीज होते आणि सांध्यामध्ये सूज येऊ लागते, ज्यामुळे दैनंदिन कामांमध्ये अडथळा निर्माण होतो.

तिसरा टप्पा

या टप्प्यात कूर्चा आता खराब झालेला असतो. सांध्यातील कडकपणामुळे रुग्णांना दैनंदिन कामांमध्ये अस्वस्थता जाणवते. वारंवार वेदना होतात, हालचाल कमी होते आणि सूज वाढू लागते.

चौथा टप्पा

या टप्प्यात रुग्णांना तीव्र वेदना, सूज आणि हालचालीवर मर्यादा येते. चालणे किंवा उभे राहणे यासारख्या साध्या क्रिया देखील आव्हानात्मक ठरु शकतात. हा प्रगत टप्पा असून यामध्ये कूर्चा पूर्णपणे झीजतो. अशावेळी अधिक विलंब न करता तज्ञाचा सल्ला घेणे योग्य राहिल.

Arthritis
Dark underarms: दह्यामध्ये 'हा' १ पदार्थ मिसळून तयार करा पेस्ट; अवघ्या १० मिनिटांत दूर होईल अंडरआर्म्सचा काळपटपणा

कशा पद्धतीने उपचार करता येतात?

लक्षणे व्यवस्थापित करण्यास आणि वेदना कमी करण्यास तज्ज्ञ तुम्हाला काही औषधांचे सेवन करण्याचा सल्ला देतील. वजन कमी करणे आणि पोहणे किंवा सायकलिंगसारखे कमी तीव्रतेचे व्यायाम गुडघ्याच्या सांध्यावरील ताण कमी करू शकतात. ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन टाळा. रुग्णांसाठी फिजीओथेरेपी हे एक वरदान ठरू शकते. गुडघ्याभोवतीचे स्नायू बळकट केल्यास शरीराला एक चांगला आधार मिळू शकतो आणि सांध्यांचे कार्य आणि गतिशीलता सुधारू शकते. डॉक्टरांच्या माहितीशिवाय कोणतेही कठोर व्यायाम करू नका.

Arthritis
Cancer: सायलेंट किलर मानले जातात 'हे' ४ कॅन्सर; कोणत्याही लक्षणाशिवाय शरीर पोखरतात, वेळीच बदल ओळखा

तज्ञांच्या सल्ल्यानेच व्यायाम करा आणि व्यायामाचा अतिरेक करू नका. गुडघ्याला ब्रेसेससारखे पर्याय देखील उत्तम ठरतात व ते गुडघ्यांवरील दबाव कमी करण्यास मदत करू शकतात. गुडघ्याचे ब्रेसेस वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रगत संधिवातासाठी शस्त्रक्रिया आणि गुडघे प्रत्यारोपण प्रक्रियांचा विचार केला जाऊ शकतो. या शस्त्रक्रिया वेदना कमी करू शकतात आणि सांध्याचे कार्य सुधारू शकतात. ही प्रक्रिया जीवनाची एकूण गुणवत्ता देखील सुधारु शकते आणि गतिशीलता पुनर्संचयित करते, ज्यामुळे रुग्णांना चालणे, पायऱ्या चढणे आणि दैनंदिन कामे सहजतेने करता येतात.गुडघ्यासंबंधी कोणत्याही तक्रारी आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com