Cancer: सायलेंट किलर मानले जातात 'हे' ४ कॅन्सर; कोणत्याही लक्षणाशिवाय शरीर पोखरतात, वेळीच बदल ओळखा

Silent killer cancer symptoms: कॅन्सरवर उपचार घेण्यास अनेकदा उशीर होतो. याचं कारण म्हणजे कॅन्सरचं निदान उशीरा होतं. मात्र जर वेळीच काही लक्षणं आणि बदल ओळखळी तर याचं निदान होण्यास मदत होईल.
Silent killer cancer symptoms
Silent killer cancer symptomssaam tv
Published On

कॅन्सरचं नाव ऐकलं की मनाला एक वेगळी भीती वाटू लागते. कॅन्सर झालाय हे व्यक्तीला समजलं तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. मात्र यापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे तो कॅन्सर जो लक्षणं न दिसता शरीरात वाढत असतो. असा पद्धतींच्या कॅन्सरला सामान्यपणे सायलेंट किलर म्हटलं जातं.

असे काही कॅन्सरचे प्रकार आहेत, ज्याची लक्षणं दिसून येत नाही. तर जी लक्षणं दिसून येतात ती रूग्णाला अगदी सामान्य वाटतात. याच कारणामुळे या गंभीर आजारावर उपचार करण्यास वेळ लागतो. परिणामी परिस्थिती गंभीर बनते. आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की, असे काही कॅन्सर आहे जे शरीराला आतून पोखरून टाकतात.

Silent killer cancer symptoms
Liver cirrhosis: लिव्हर सिऱ्होसिस पूर्णपणे बरा होऊ शकतो का? पाहा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

ओव्हरी कॅन्सर

हा महिलांमध्ये दिसून येणारा सर्वात धोकादायक सायलेंट किलर मानला जातो. यामध्ये पोट फुगणं, पचनासंबंधी समस्या, भूक न लागणं अशी लक्षणं सामान्यपणे दिसून येतात. त्यामुळे याची लक्षणं ओळखणं काहीसं कठीण असतं. नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका स्टडीनुसार, हा कॅन्सर अंडाशयात नाही तर फेलोपियन ट्यूबमध्ये सुरु होतो.

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर

या कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये कोणतंही मोठं लक्षण दिसून येत नाही. अनियमित मासिक पाळी, रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्राव, पेल्विक पेन ही याची सामान्य लक्षणं मानली जातात. जर्नल ऑफ कॅन्सर रिसर्च एंड थेरेप्यूटिक्समध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, एक प्रकरण समोर आलं होतं, ज्यामध्ये व्यक्तीला चौथ्या स्टेजमध्ये पोटदुखी आणि वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होत होता.

Silent killer cancer symptoms
Dark underarms: दह्यामध्ये 'हा' १ पदार्थ मिसळून तयार करा पेस्ट; अवघ्या १० मिनिटांत दूर होईल अंडरआर्म्सचा काळपटपणा

अंडकोषांमध्ये होणारा कर्करोग (Testicular cancer)

१५ ते ३५ वर्षांच्या पुरुषांमध्ये हा कॅन्सरचं प्रमाण आता सामान्य झालं आहे. मात्र अनेक पुरुष त्याकडे दुर्लक्ष करतात. वेदनारहित गाठ किंवा जडपणा वाटणं ही या कॅन्सरची लक्षणं आहे. काही प्रकरणांमध्ये हा कॅन्सर वेगाने पसरतो.

Silent killer cancer symptoms
Eye Care: उन्हाळ्याच्या दिवसात वाढतायत 'डोळे येण्याच्या' समस्या; जळजळ आणि लालसरपणा कसा कराल कमी, जाणून घ्या

किडनी कॅन्सर

हा कॅन्सर अनेक वर्ष शरीरामध्ये लक्षणाशिवाय वाढत राहतो. कालांतराने लघवीतून रक्त येणं, पाठी दुखणं अशी सामान्य लक्षणं दिसून येतात. या समस्या किरकोळ समजून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com