Surabhi Jayashree Jagdish
शरीराच्या आरोग्याप्रमाणे केसांची काळजी घेणंही महत्त्वाचं असतं.
केस चमकदार आणि मजबूत रहावेत यासाठी आपण पार्लरमध्ये जातो.
हेअर स्पा नाव तुम्ही ऐकलं असेल, मात्र यामध्ये नेमकं काय केलं जातं हे तुम्हाला माहितीये का?
हेअर स्पा ही एक हेअर ट्रीटमेंट आहे. ज्यामध्ये शॅम्पू, हेअर क्रीम आणि हेअर मास्क, कंडिशनर यांचा वापर केला जातो.
या प्रोडक्ट्सचा वापर करून तुमच्या केसांना डीप मॉइश्चरायझिंग केलं जातं. यासोबत स्टीम देखील देण्यात येते.
या प्रक्रियेमध्ये केसाच्या मुळाशी असलेली छिद्र उघडण्यात येतात.