उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू का बांधलेले असतात?

Surabhi Jayashree Jagdish

रसवंती केंद्र

काहीशी दूर असलेलं रसवंती केंद्र देखील आपण आवाजाने ओखळू शकतो. याचं कारण म्हणजे त्या मशीन मधून येणारा 'छुमछुम' असा आवाज.

मशीला लावलेले घुंगरू

हा आवाज उसाचा रस काढणाऱ्या मशीनला लावलेल्या घुंगरांमधून येत असतो.

का बांधले जातात?

मात्र उसाचा रस काढल्या जाणाऱ्या या घुंगरू का बांधण्यात येतात हे तुम्हाला माहितीये का?

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी?

मशीनला लावण्यात आलेले हे घुंगरू ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असतात असं अनेकांना वाटतं. मात्र हे घुंगरू त्यासाठी नसतात.

कृतज्ञतेची भावना

या घुंगरांचा संबंध रसवंती गृह चालकांच्या कृतज्ञतेच्या भावनेशी जोडलेला आहे.

लाकडी घाणा

पूर्वी बैलांच्या सहाय्याने फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर उसाचा रस काढला जात असे.

बदल

मात्र यामध्ये काळानुसार अनेक बदल झाले आणि या लाकडी घाण्याची जागा लोखंडी मशीन्सने घेतली.

जाणीव

कधीकाळी बैलांच्या अथक श्रमामुळे कुटुंबाचं पोटं भरलं ही जावीण मनात ठेऊन रसवंती गृह चालवणाऱ्या शेतकऱ्यांनी लोखंडी मशिनला घुंगरू लावण्यास सुरुवात केली.

महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, वाचून तुम्हाला बसेल धक्का

येथे क्लिक करा