Type 5 diabetes: सडपातळ लोकांनाही नकोसा असलेला नवा डायबिटीस, काय आहे टाईप-5?

What is Type 5 diabetes : टाईप-2 डायबिटीस असणाऱ्यांचं शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही, किंवा इन्सुलिन तयार होत असलं तरी, त्याचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे साखरेचं प्रमाण नियंत्रणात रहात नाही.
Type 5 diabetes
Type 5 diabetesSAAM TV
Published On

डायबिटीस फक्त लठ्ठ लोकांना होतो आणि बारीक लोकांना नाही, असा अनेकांचा समज आहे. पण कमी BMI, म्हणजे बॉडी मास इंडेक्स असणाऱ्यांनाही डायबिटीस होऊ शकतो. सामान्यत आढळणाऱ्या टाईप-1 किंवा टाईप-2 डायबिटीसपेक्षा हा वेगळा आहे, असं अलीकडेच बँकॉकमध्ये झालेल्या वर्ल्ड डायबिटीस कॉन्फरन्समध्ये तज्ज्ञांनी जाहीर केलं. मात्र तुम्हाला टाईप-५ डायबेटीज बद्दल माहितीये का?

BMI म्हणजे काय?

टाईप-5 डायबिटीसबाबत माहिती घेण्याआधी BMI म्हणजे काय ते समजावून सांगतो. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. तुमच्या शरीरात फॅटचं प्रमाण किती आहे हे BMI काउंटवरून कळतं. यात वजन आणि उंची यांचं गुणोत्तर केलं जातं. BMI 25 किंवा जास्त असेल तर तुमचं वजन जास्त आहे म्हणजे ओव्हवेट आहे असं मानलं जातं. BMI 30 पेक्षा जास्त असेल तर त्याला ऑबेसिटी म्हणजे लठ्ठपणाचं लक्षण समजतात.

Type 5 diabetes
Sunscreen Frequency : एका दिवसात किती वेळा सनस्क्रीन लावली पाहिजे? सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धतही जाणून घ्या

डायबिटीस MODY म्हणजे काय?

Diabetes.co.uk च्या माहितीनुसार, टाईप-5 डायबिटीसला डायबिटीस MODY असंही म्हणतात. MODY म्हणजे, maturity onset diabetes of the young. 19 पेक्षा कमी BMI असलेल्या लोकांमध्ये आढळणाऱ्या मधुमेहाला टाईप-5 डायबिटीस मानतं जातं. हा प्रामुख्याने लठ्ठ नसणाऱ्या - बारीक लोकांमध्ये आढळतो. हा नवीन प्रकारचा डाटबिटीस लठ्ठपणाशी नाही तर कुपोषणाशी संबंधित आहे.

International Diabetes Federation च्या माहितीनुसार, टाईप-5 डायबिटीस म्हणजे शरीरात इन्सुलिनचं अत्यंत कमी प्रमाण आणि चयापचय क्रियेवर खूप कमी नियंत्रण असणं. टाईप-1 डायबिटीसमध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या सेल्स नष्ट होतात तर टाईप-2 मध्ये शरीर इन्सुलिन तयार करत नाही किंवा त्याचा योग्य वापर करत नाही.

Type 5 diabetes
IBS: इरिटेबल बाऊल सिंड्रोम म्हणजे नेमकं काय? पचनसंस्थेशी संबंधित समस्येबाबत काय आहेत गैरसमज?

International Diabetes Federation च्या माहितीनुसार, टाईप-5 डायबिटीसचं प्रमुख कारण हे कुपोषण आणि लहान वयात पौष्टीक आहार न मिळणं हे पाहायला मिळतं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार. टाईप-5 डायबिटीस पूर्णत वेगळा आहे. असं मानलं जातंय की, दिर्घकाळ पोषक आहाराच्या कमतरतेमुळे स्वादुपिंडाच्या विकासात बिघाड झाल्यामुळे होतो. क्रिश्चन मेडिकल कॉलेज, इंडियाच्या एंडोक्रिनोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. निहाल थॉमस म्हणाले, या स्थितीत पॅन्क्रियासमधील बीटा पेशींचे कार्य बिघडतं, ज्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन योग्य होत नाही.

टाईप-5 डायबिटीस कोणाला होऊ शकतो?

टाईप-5 डायबिटीस हा दुर्मिळ आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न देशांमध्ये याचा प्रभाव जास्त असल्याचं आढळून आलंय. International Diabetes Federation ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात 20 to 25 मिलियन लोकांना टाईप-5 डायबिटीस आहे. आशिया आणि अफ्रिकेत याचं प्रमाण खूप जास्त आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, टाईप-5 मधुमेह अशा बारीक लोकांना होऊ शकतो ज्यांचा BMI हा 19 पेक्षा कमी आहे आणि शरीरातलं इन्सुलिन तयार होण्याचं प्रमाणच कमी आहे.

Type 5 diabetes
Water after meals: जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे? पाहा आयुर्वेद काय सांगतं?

कोणाला होऊ शकतो?

  • बालपणी कुपोषिणग्रस्त

  • गर्भावस्थेत कमी BMI

  • 30 वर्षांखालील व्यक्ती

  • पुरुष

  • रोज मोठ्या प्रमाणात इन्सुलिनची गरज भासणारे

International Diabetes Federation च्या माहितीनुसार, टाईप-5 डायबिटीसच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनचं प्रमाण खूप कमी असतं पण ते इन्सुलिन रेझिस्टंट नसतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पालकांकडून मुलांमध्ये पासऑन झालेल्या जेनेटिक म्युटेशनमुळे हा डायबिटीस होण्याची शक्यता असते. पालकांच्या जिन्सवर परिणाम झाला असेल तर 50 टक्के शक्यता असते की मुलांमध्ये याचा परिणाम पहायला मिळू शकतो.

टाईप-5 डायबिटीसवर औषध आहे?

टाईप-1 आणि टाईप-2 मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी काही रुग्ण गोळ्या घेतात तर काही इन्सुलिनचं इंजेक्शन. पण या नवीन डायबिटीसवर काही औषध आहे. International Diabetes Federation च्या माहितीनुसार, टाईप-5 डायबिटीसचे बहुतांश रुग्ण औषधांनी मधुमेह नियंत्रित ठेऊ शकतात. अल्प आणि मध्मम उत्पन्न देशातील लोकांसाठी हा इन्सुलिनपेक्षा चांगला पर्याय आहे. अशा व्यक्ती ज्या लठ्ठ नाहीत वा ज्यांचं शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही, अशा लोकांमध्ये आढळणाऱ्या मधुमेहाचं 'टाईप-5 डायबिटीस' असं वर्गीकरण करावं आणि त्याबद्दल अधिक संशोधन करण्यात यावं असं इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनचे अध्यक्ष प्रा.पीटर श्वार्झ यांनी जाहीर केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com