
सनस्क्रीन आपल्या त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसात चेहऱ्यासाठी सनस्क्रिन वापरण्याचा सल्ला देतात. सूर्याची अल्ट्रावॉयलेट (UV) किरणं आपल्या त्वचेचं नुकसान करतात. यामुळे चेहरा आणि त्वचेवर सुरकुत्या किंवा त्वचेचा कॅन्सर यांच्यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
एकंदरीत उन्हाळ्याच्या दिवसांत सनस्क्रीनचा वापर गरजेचा आहे. मात्र तुम्हाला माहितीये का, एका दिवसात किती वेळा सनस्क्रिनचा वापर केला पाहिजे? शिवाय सनस्क्रिन योग्य पद्धतीने न लावल्यास किती नुकसान होतं? या आर्टिकलच्या माध्यमातून आपण ही गोष्ट जाणून घेऊया.
कदाचित तुम्ही ऐकलं असेल की सनस्क्रीन लावल्याने तुमच्या त्वचेला किंवा चेहऱ्याला दिवसभर संरक्षण मिळतं. मात्र हे चूक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दिवसातून कमीत कमी २ ते ३ वेळा सनस्क्रिन लावली पाहिजे. जेव्हा तुम्ही घराबाहेर पडत असाल तेव्हा तर तुम्ही याचा वापर केलाच पाहिजे.
सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. जेणेकरून सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमचं संरक्षण होईल.
जर तुम्ही पूर्ण दिवस बाहेर असाल तर प्रत्येक २ किंवा ३ तासांनी सनस्क्रिन लावलं पाहिजे.
जर तुम्ही स्विमींग करत असाल किंवा तुम्हाला जास्त प्रमाणात घाम येत असेल तेव्हा सनस्क्रिनचा परिणाम कमी होतो. अशावेळी फ्रेश वाटण्यासाठी तुम्ही सनस्क्रिन लावली पाहिजे.
सूर्याची हानिकारक किरणं तुमच्या त्वचेला नुकसान करतात. अशावेळी जर तुम्ही सनस्क्रिनचा वापर केला नाही तर सुरकुत्या, डार्क स्पॉट्स आणि फाईन लाईन्स दिसू शकतात.
सूर्याच्या किरणांमुळे त्वचेच्या DNA वर विपरीत परिणाम होतो. ज्यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. अशावेळी सनस्क्रिन तुमचा त्वचा डॅमेज होण्यापासून मदत करते.
सूर्याच्या किरणांमुळे तुमच्या त्वचेला एलर्जी होण्याचा धोका असतो. यामध्ये चेहरा किंवा त्वचा लाल होणं, सूजणं असा समस्या उद्भवतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.