Paresh Rawal: लघवी पिऊन बरं झाल्याचा अभिनेते परेश रावल यांचा दावा; खरंच युरीन पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Drinking Urine Health Risks: परेश रावल यांनी एका मुलाखतीत, ते 15 दिवस स्वतःचीच लघवी बियरसारखे प्यायले असल्याचं सांगितलं आहे. या अभिनेत्याने असं करण्यामागील धक्कादायक कारणही सांगितलं आहे.
Paresh Rawal
Paresh Rawalsaam tv
Published On

नुकतंच बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी एका इंटरव्यूमध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, ते स्वतःची लघवी प्यायले होते. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर एकच मोठी खळबळ उडाली. काही व्यक्ती याला घरगुती उपाय म्हणून ही गोष्ट आरोग्यासाठी चांगली असते, असं म्हणतात. मात्र खरंच मानवाची लघवी औषध म्हणून काम करते का, याचं उत्तर आपण डॉक्टरांकडून जाणून घेतलंय.

परेश रावल यांचा दावा

एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना परेश रावल यांनी खुलासा केला होता की, गुडघ्याच्या दुखाण्याला बरं करण्यासाठी ते १५ दिवस स्वतःची लघवी पीत होते. मुंबईच्या मासळी बाजारात एका सिनेमाच्या शूटींगदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतर रूग्णालयात दाखल केलं गेलं.

दरम्यान यावेळी अजय देवगनचे वडील वीरू देवगन परेश रावल यांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी परेश यांनी लघवी पिण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून ते लवकर बरे व्हावेत. मुख्य म्हणजे परेश रावल यांनी असं केलं आणि ते बरे देखील झाले.

खरंच लघवी पिणं आरोग्यासाठी योग्य?

यासंदर्भात मुंबईतील डॉ. योगेश दळवी यांनी सांगितलं की, आपली लघवी ही सामान्यपणे शरीरातील निघालेलं वेस्ट म्हणजेच कचरा असतो. यामध्ये युरिया, टॉक्सिन्स आणि इतर घाण घटक असतात. हे घटक शरीरातून बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिलं तर युरिन पिणं हे आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नाही. उलट यामुळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका वाढू शकतो.

Paresh Rawal
Heart health: तुमच्या 'या' चुकांमुळे धोक्यात येतंय हृदयाचं आरोग्य

लघवी प्यायल्याने होणाऱ्या समस्या

इन्फेक्शन

डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे, लघवीमध्ये बॅक्टेरिया असतात जे पुन्हा शरीरात जाऊन पसरू शकतात. यामुळे पोटावर विपरीत परिणाम होतो. परिणामी तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं.

किडनीवर परिणाम

लघवीमध्ये असलेलं टॉक्सिन पुन्हा शरीरात गेल्यास किडनीवर दबाव येतो. ही घाण किडनीला पुन्हा फिल्टर करावी लागू शकते. त्यामुळे समस्या वाढू शकतात.

Paresh Rawal
Chicken Cancer Risk : सावधान! चिकन खाल्ल्यानं कॅन्सर होत असल्याचं संशोधनातून उघड

डिहायड्रेशन

लघवी प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होईन डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. लघवीमध्ये मीठ आणि वेस्ट मटेरियल असतं. त्यामुळे हे प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होऊ शकतं.

Paresh Rawal
Blockages in arteries: शरीरातील रक्तवाहिन्या बंद झाल्यास पायांमध्ये सकाळी दिसतात 'हे' मोठे बदल, कसे कराल उपाय

लघवी पिऊन कोणी बरं होऊ शकतं का?

काही प्राचीन उपचारपद्धतींमध्ये लघवीला उपाचारांचा भाग मानलं जातं होतं. याला 'ऑटो यूरिन थेरेपी' असं म्हटलं जायचं. मात्र सध्या मेडिकल सायन्समध्ये याबाबत कोणतेही ठोस पुरावे नाहीत. लघवी प्यायल्याने माणून आजारी पडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com