Variety of French Fries Saam TV
लाईफस्टाईल

Fries Recipe: बटाटा नाही 'या' पदार्थांपासून बनवा क्रन्ची फ्रेंच फ्राईज; एकदम सोपी रेसिपी

Besan, Banana, Sweet Potato Fries Recipe in Marathi: फ्रेंच फ्राईज हा पदार्थ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडतो. फ्रेंच फ्राईज बटाट्याशिवाय इतर अनेक पदार्थांपासून बनवता येतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वांना फास्ट फूड खायला खूप आवडते. फास्ट फूडमध्ये फ्रेंच फ्राईज हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. उत्तम चव आणि झटपट होणारा हा पदार्थ अनेकांच्या घरी बनवला जातो. फ्रेंच फ्राईज हे तळलेले असल्याने त्यात खूप कॅलरीज असतात. तळलेले पदार्थ खालल्याने शरीराला त्रास होतो. बटाट्याचे पदार्थ तळल्याने त्याल खूप तेल राहते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बटाट्याऐवजी इतर गोष्टींपासून फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

चना डाळ फ्राईज (Chana Dal Fries Recipe)

चना डाळ फ्राईज बनवण्यासाठी तुम्हाला चना डाळ, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, हळद, तिखट, मीठ आणि तेल ही साम्रगी आवश्यक आहे.

चना डाळीचे फ्राईज बनवण्यासाठी सर्वप्रथम चना डाळ धुवून ६ तास भिजवून ठेवा. भिजवलेली चनाडळा मिक्सरमध्ये वाटून घ्या. यानंतर एका भांड्यात चना डाळ, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, हळद, तिखट आणि मीठ घालून मिक्स करा. यानंतर या मळलेल्या पीठाला फ्राईजचा आकार द्या. यानंतर कढईत तेलात सोनेरी रंग येईपर्यंत फ्राईज तळून घ्या.

केळ्याचे फ्राईज (Banana Fries Recipe)

सर्वप्रथम कच्ची केळी सोलून स्वच्छ धुवून घ्या. यानंतर केळीचे बारीक आकारात काप करा. हे काप काही मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवा. त्यानंतर हे काप तेलात तळून घ्या. हे तळून झाल्यावर त्यावर मीठ, तिखट टाकू शकता. हे फ्राईज तुम्ही सॉससोबत खाऊ शकता.

रताळ्याचे फ्राईज (Sweet Potato Fries Recipe)

रताळ्याचे फ्राईज बनवण्यासाठी तुम्हाला रताळे, तेल, मीठ, काळी मिरी पावडर हे साहित्य आवश्यक आहे.

रताळ्याचे फ्राईज बनवण्यासाठी एका भांड्यात थेोड तेल घ्या. त्यात मीठ, काळी मिरी पावडर टाका. त्यानंतर रताळे मिक्स करा. हे रताळे तुम्ही ओव्हमध्ये २०० डिग्री सेल्सियसवर २० ते २५ मिनिटे बेक करुन घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT