Rohini Gudaghe
बटाट्याची वरची साल काढत फ्रेंच फ्राईजच्या शेपमध्ये काप करून घ्या.
त्यानंतर पाच मिनीट बटाट्याचे काप पाण्यात राहू द्या.
एका पातेल्यात पाणी उकळा.
पाण्याला उकळी आल्यानंतर मीठ आणि बटाट्याचे काप सोडा.
चांगली उकळी आल्यावर ५ मिनीट झाकून ठेवा.
नंतर बटाट्याचे काप पाण्यातून काढत त्याला कपड्याने हलक्याने पुसून घ्या.
आता कढईत तेल गरम करा.
बटाट्याचे काप तेलात सोडता. सोनेरी होईपर्यंत तळा. तुमचे फ्रेंच फ्राईज तयार झाले.