

मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्टेशन मध्ये साईडला उभ्या असलेल्या कचरा उचलणाऱ्या लोकल मध्ये लागली आग
काँग्रेस नेते,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पुण्यात सभा
काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण पुणे दौऱ्यावर
प्रशांत जगताप यांच्या प्रभागात पृथ्वीराज चव्हाण घेणार सभा
पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपच्या कुठल्या ही उमेदवाराला किंवा पदाधिकाऱ्यांना पक्षाने डावललं नसल्याची स्पष्ट भूमिका भाजपचे प्रल्हाद सायकर आणि प्रकाश बालवडकर यांनी व्यक्त केलीय. १९९७ पूर्वीपासून हे दोघे ही पुण्यातील बाणेर भागात पक्षासाठी काम करतात. भौगोलिक रचना बदलत असल्यामुळे पक्षाने थांबवायचा आदेश दिला आम्ही थांबलो पण संघटनेचे काम करत आलो आणि ते करत राहू असा विश्वास प्रल्हाद सायकर यांनी व्यक्त केलाय. भाजप ने आत्तापर्यंत कोणाला डावललं नाही, पक्षाकडून सगळ्यांना त्याचं त्याचं फळ मिळतं पण संयम पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रकाश बालवडकर यांनी दिलीय.
भाजपाला सत्तेपासून थांबवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव अशी आमच्या पक्षाची दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती त्यामुळे आम्ही महापालिका निवडणुकीत एकत्र आलो आहोत. हिंदू संस्कृतीमध्ये पवार एकत्र असणं याला खूप महत्त्व आहे. दोन्ही परिवार एकत्र रहावे ही माझी देखील इच्छा मात्र राजकारणात सर्व गोष्टी साध्य होत नाहीत.
पवार परिवार एकत्र राहावं ही माझी देखील इच्छा आहे. मात्र राजकारणात सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील असं नाही. मात्र सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा मी स्वागत करतो असं देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केला आहे
वसई विरार महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापालिका निवडणुकीत पहिली जाहीर सभा नालासोपाराच्या सेंट्रल पार्क मैदानात उद्या तीन वाजता पार पडणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योग, बांधकाम, व्यावसायिक अशा विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उदय सामंत आले होते नाशिकला
पोलीस परेड मैदानावर सामंत यांचे हेलिकॉप्टर झाले होते लँड
शिवसेना शिंदे गटात गेलेले प्रकाश महाजन यांनी या मुलाखतीवर प्रतिक्रिया देत थेट राज ठाकरेंवर बोचरी टीका केलीय.
जळगाव महानगरपालिकेत युतीधर्म न पाळणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या बंडखोरांवर यावेळी पक्षातर्फे कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक रंजना सपकाळे, कांचन सोनवणे चेतना चौधरी ,जितेंद्र मराठे यांच्यासह भाजपाचे बंडखोर सदस्य यांची पक्षातून हकलपट्टीची कारवाई करण्यात आली आहे
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजपा + अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची प्रचारसभा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. यावेळी अहिल्यानगरच्या नावावरून पुन्हा एकदा नगरचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यात काँग्रेस-शिवसेनेचा डिजिटल जाहीरनामा सादर होणार
पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये थोड्याच वेळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सतेज पाटील यांची पत्रकार परिषद
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने डिजिटल जाहीरनामा होणार सादर
मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजप आणि एमआयएम अशी छुपी युती असल्याचा खळबळजनक आरोप समाजवादी पार्टीच्या मालेगाव महानगर अध्यक्ष शान- ए- हिंद यांनी केलाय. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रचारसभेत ' मालेगावात भाजपचाच महापौर बसेल ' असे वक्तव्य केले होते, याचाच संदर्भ शान ए हिंद यांनी दिला.
चोराला चोर म्हटले तर कुणाला वाईट वाटत असेल तर नाईलाज आहे अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर केली.
नांदेड महापालिकेसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली , एका जाहीर सभेत भाजपा खासदार यांनी पक्ष सोडुन गेलेल्याना थेट इशारा दिला.जे मला सोडुन गेले ते बरबाद झाले , माझ्या नादी लागू नका , नादी लागलं तर असं होतें असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले.जे गेले जाऊ द्या , एक गेला की दुसरा आला.जे सोडुन गेले ते बरबाद झाले असं अशोक चव्हाण म्हणाले.
शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महिलेला मान देण्यात आलेला आहे, उपनगराध्यक्ष पदावर भाजप पक्षाचे संगीता देवरे यांची निवड करण्यात आली आहे,
भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार हे पुण्याचे सर्वात मोठे 'आका' असल्याची टीका अजित पवारांवर केली होतीय. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा वारसा हा शरद पवार आणि अजित पवार या सिंह आणि वाघाचा आहेय. त्यामुळे आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नसल्याचा चिमटा आमदार अमोल मिटकरी यांनी लांडगेना काढलाय. महेश लांडगे यांना कदाचित पुण्याचे आणि महाराष्ट्राचे पुढचे काका कोण?, हे म्हणायचं असेल. मात्र, त्यांनी चुकीने 'आका' म्हटलं असावं असा प्रतिटोला आमदार मिटकरी यांनी लगावलाय.
सोलापुरात महाविकास आघाडीकडून न्याय, विकास आणि समृद्धी त्रिसूत्री आधारित जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला..
महाविकास आघाडी कडून 'शहर प्रथम' म्हणून सोलापुरातील बहुभाषिक, बहूसांस्कृतिक आणि धर्मनिरपेक्ष घोषणा केली..
यावेळेस खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार आडम मास्तर, शिवसेना UBT उपनेत्या अस्मिता गायकवाड राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शहराध्यक्ष महेश गादेकर यांची प्रमुख उपस्थिती..
काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांचे पुत्र कुणाल अशोक जाधव यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत जाधव यांनी केला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
कोल्हापूर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पुरोगामी विचारांचे शहर आहे. या शहराच्या विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि सक्षम प्रशासन देण्याचा संकल्प शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून करत आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडवणे, शहराचा नियोजनबद्ध विकास करणे आणि सर्वसमावेशक प्रगती साधणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
नाशिकच्या उद्योजकांसोबत उदय सामंत साधतायत संवाद
महापालिका निवडणुकीआधी उदय सामंत यांचा उद्योजकांशी संवाद
नाशिकच्या उद्योजकांच्या अडचणी आणि योजनांसंदर्भात करतायत चर्चा
नाशिकच्या उद्योजकांना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वासाठी केली विनंती
रोजगार हमी योजनेच्या कामाची पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने हिंगोलीच्या औंढा नागनाथ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाले आहे, शिवसेनेने औंढा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची प्रतिकात्मक प्रतिमा तयार करत गाढवावरून शहरात थंड काढली आहे
अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे गरोदर मातेचा व तिच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली
ही घटना शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण आहे
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार, दिनांक रोजी दुपारी 12 वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृवात धरणे आंदोलन करण्यात आले
काँग्रेसमधील १२ निलंबित नगरसेवक आज भाजपात प्रवेश करत आहेत
रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा प्रवेश होत आहे
नवीमुंबईसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस बिलाचा पहिला हप्ता तीन हजार रुपये दिला असताना आमदार अभिजीत पाटील यांच्या ताब्यातील सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक चार हा शेतकऱ्यांना पहिला हप्ता तीन हजार रुपये देत नाही. त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्याची मागणी आहे. त्यासाठी कारखाना स्थळांवर शिवसेना (उबाठा) युवा सेनेचे तालुका युवा अधिकारी सुभाष भोसले, शंकर मेटकरी, सचिन सुरवसे या तिघांचे सोमवारपासून सुरू असणारे आमरण उपोषण आक्रमक झाले आहे. आज साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात सांगोला अकलूज मार्गावर शेतकरी आणि उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात भीषण अपघात
उज्जैन येथे दर्शनासाठी निघालेल्या मित्रांचा कन्नड घाटात भीषण अपघात
घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज
या अपघातात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू
अपघात इतका भीषण की वाहनाचे मोठे नुकसान अपघातात चार जण गंभीर जखमी
जखमींना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे
कालच्या राड्यानंतर इम्तियाज जलील यांच्या सुरक्षेत वाढ
आजपासून जलील यांच्यासोबत 10 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
दोन बंदूकधारी पोलीस देखील सुरक्षेत असणार
पोलीस उपनिरीक्षकसह पोलीस कर्मचारीसोबत असणार
नाशिकच्या येवला शहरात तेजतारा वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने एक स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला.संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकीस्वारांसाठी सेफ्टी स्टिकचे मोफत वाटप करण्यात आले.या उपक्रमाद्वारे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवन सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले.विशेषतः दुचाकीस्वार, डिलिव्हरी बॉय आणि नियमित प्रवासी यांना या सेफ्टी स्टिकचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.तेजतारा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी“नायलॉन मांजा म्हणजे मूक मृत्यू – सजग राहा, सुरक्षित रहा”हा संदेश देत नागरिकांना जनजागृती केली.या वेळी फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत तेजतारा फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.अशाच प्रकारचे समाजहिताचे उपक्रम पुढील काळातही राबवण्याचा संकल्प तेजतारा फाउंडेशनने व्यक्त केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात नायलॉन मांजाची अवैध विक्री आणि वापर रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.राज्यात बंदी असतानाही छुप्या पद्धतीने होणारी विक्री थांबवण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस. यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दीड महिन्यात मोठ्या प्रमाणावर मांजा जप्त करण्यात आला असून, दोषींवर थेट सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीवर भर दिला जात आहे. गेल्या वर्षी मांजामुळे झालेल्या बालकाच्या मृत्यूनंतर यंदा पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. जिल्ह्यात कुठेही नायलॉन मांजाची विक्री किंवा साठा आढळल्यास नागरिकांनी तात्काळ 112 वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी आटपाडीचे नगराध्यक्ष उत्तम जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आटपाडी ते पंढरपूर अशी 60 किलोमीटर पदयात्रा काढून विठुयाराला साकडे घातले. सलग 21 तास चालत येवून आज सकाळी आमदार पडळकर समर्थकांनी विठुरायाचे दर्शन घेतले.
सर्वसामान्य,वंचित लोकांचे नेतृत्व करत असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्य मंत्रीमंडळात स्थान मिळू दे असे साकडे विठुरायाला घातल्याचे नगराध्यक्ष उत्तम जाधव यांनी सांगितले.विठ्ठल नामाचा आणि गोपीचंद पडळकर यांचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी पदयात्रा पूर्ण केली.
ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ तसेच पश्चिम घाटाचे तज्ञ अभ्यासक माधव गाडगीळ यांच्या दुःखद निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रदूषण मुक्त पर्यावरण करणे हेच माधव गाडगीळ यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल या शब्दात अजित पवार यांनी माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अमित देशमुख यांनी सरकारच्या निधिला जागोजागी कात्री लागत असल्याचा आरोप केला आहे.आज दिल्ली आणि मुंबई वरून जो पैसा येतो त्याला किती कात्री लागतात हे सांगायला नको म्हणत लातूर मधील भाजपाच्या स्थानिक आमदारांवर घनाघात केलाय, एक कात्री निलंग्याची लागते, दुसरी औसा, तर तिसरी कात्री ही लातूर ग्रामीणची, आणि चौथी उदगीरची कात्री लागत असल्याचं काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी म्हटले आहे,
तडीपार गुन्हेगार माजी आमदार अनिल भोसले प्रचारात
पुणे पोलीस आयुक्तांचे दुर्लक्ष
प्रभाग ७ मध्ये काळी जादू करण्यासाठी आणि अनिल भोसले यांनी आणले काही तांत्रिक
तांत्रिक आणण्याचे सीसीटीव्ही राजू पवारांनी केलं सादर
भाजपचे उमेदवार रेश्मा भोसले यांचा प्रचार करण्यासाठी त्यांचे पती माजी आमदार अनिल भोसले तडीपार असताना प्रचारासाठी मतदारसंघात फिरत आहेत. याबाबतचे सीसीटीव्ही काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांनी काढला आहे. पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी व विविध गुन्हे अनिल भोसले यांच्या वरती दाखल असल्याने त्यांना तडीपार करण्यात आलेला आहे.
अनिल भोसले हे शिवाजीनगर वाकडेवाडी या ठिकाणी अनेक कल्याण मध्ये फिरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.
प्रचारादरम्यान काळी जादू करण्यासाठी त्यांनी काही तांत्रिक आणल्याचे व्हिडिओ राजू पवार यांनी माध्यमांसमोर मांडले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
8, 9 आणि 10 जानेवारी या तीन दिवसांत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे....या यात्रेचा मुख्य आकर्षण ठरणार आहे 10 जानेवारी रोजी होणारे महाप्रसादाचे भव्य वितरण.
या दिवशी लाखो भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार असून यासाठी तब्बल 350 क्विंटल गव्हाची पुरी आणि वांग्याची भाजी तयार करण्यात येणार आहे....महाप्रसादाचे वितरण दरवर्षीप्रमाणे यंदा पण ट्रक्टरच्या साहाय्याने करण्यात येणार असून त्यामुळे भाविकांपर्यंत जलद आणि सुव्यवस्थित पोहोच सुनिश्चित केली जाणार आहे.
या महोत्सवासाठी जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी वाहतूक, पाणी, आरोग्य व सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
स्वामी विवेकानंदांचे विचार आणि राष्ट्रसेवेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणारा हा यात्रा महोत्सव यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे....
वाशिम जिल्ह्यात नगर पालिकेच्या झालेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना कर थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक केल्यामुळे पालिकांना मोठा फायदा झाला आहे. या अटीमुळे इच्छुक उमेदवारांना थकीत कर भरावा लागला असून त्यामुळे चार नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांची करवसुली झाली. एकट्या वाशिम नगरपालिकेतच निवडणूक काळात १ कोटी २३ लाख रुपयांची कर वसुली झाली असून, निवडणूक प्रक्रियेमुळे पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडल्याचं चित्र समोर आलं आहे
परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने भाजपच्या सहा पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आहे आणि या बंडखोर पदाधिकाऱ्यांना भाजपचे शहर अध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी भाजपमधून हकालपट्टी करत कारवाई केली आहे पक्षांची शिस्त मोडल्यामुळे ही कारवारी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कानावर टाकत शिवाजी भरोसे यांनी मंडळ अध्यक्ष स्वप्निल पिंगळकर, प्रदेश कार्यकारी सदस्य राजेश देशपांडे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुमित भालेराव, अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष ओम मुर्दिराज , लक्ष्मीकांत क्षीरसागर , दिनेश नरवाडकर या सहा बंडखोर पदाधिकाऱ्यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे
२९ हजार ९१२ मतदारांची नावे समान, मात्र व्यक्ती वेगवेगळ्या आहेत..
समान नाव असलेले मतदार स्वतंत्र असल्याची खात्री आयोगाकडून केली आहे. त्यामुळे मतदारांच्या नावांपुढील दोन स्टार चिन्ह हटवण्यात आले
आतापर्यंत ३ हजार १९० दुबार मतदारांनी संमतीपत्र भरले.
विधानसभा मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापर महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी प्रभागनिहाय विभागली जाते
मतदानाच्या दिवशी दोन स्टार असलेल्या मतदारांकडून हमीपत्र घेतले जाणार आहे
इतर केंद्रावर मतदान केले नसल्याचे हमीपत्र बंधनकारक, संपूर्ण ओळख पटल्यावरच अशा मतदारांना मतदानाची परवानगी
नागपुरात एकूण २४ लाख ८३ हजार ११२ मतदार नोंदणीकृत, तपासणीत दुबार मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात उघडकीस आली
शोध मोहिमेनंतर दुबार आणि समान नावांमधील फरक स्पष्ट करण्यात आला
पर्यावरण आणि परिसंस्था वाचवा असा संदेश देणारे माधव गाडगीळ सर 83 वर्षांचे होते. डॉ शिरीष प्रयाग यांच्या हॉस्पिटल मध्ये त्यांचे निधन झाले. आज संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंकर करण्यात येतील.
बुलडाणा जिल्ह्यातील सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या जळगांवजामोद तालुक्यातील ' ब ' दर्जा प्राप्त तिर्थक्षेत्र पळशी सुपो येथे पौष महिन्यात यात्रेला सुरुवात झाली पुढील तीन आठवडे यात्र सुरु राहते या यात्रेला देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात... त्यानिमित्त लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेणार आहेत...
यात्रेत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली असून आकाश पाळणे, लहान मुलांचे खेळ, विविध प्रकारची खेळणी, दराबा आणि प्रसिद्ध असलेल्या दाळ्या रेवड्यांची दुकाने यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात सजली आहेत..... तगडा पोलीस बंदोबस्त व या यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी जळगांव जामोद एस. टी. आगरा कडून व्यवस्था करण्यात आली आहे...
हा यात्रा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी गावातील नवयुवक तथा श्री सुपो संस्थानंचे विश्वस्त, कर्मचारी, स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिक स्वयंस्फूर्तीने श्रमदान करतात....
अशी माहिती संस्थांचे अध्यक्ष अरुण वसंतराव देवकर यांनी दिली...
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका बिबट्यांसाठी हॉटस्पॉट ठरत असून, देवगाव परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे . बिबट्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी विद्यार्थी व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन देखील केले होते त्यानंतर या परिसरात विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले दरम्यान परसराम बोचरे यांच्या मालकीच्या शेतात पाचवा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून
निवडणुकीच्या रणनीतीसाठी महाजनांचा चार दिवस नाशिकमध्ये तळ
सभेची तयारी आणि बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू
भाजपाचा नाशिकमध्ये शंभर प्लस चा नारा
गिरीश महाजन घेणार प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक गाठी भेटी
शहरातल्या तीनही विभागाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेणार भेटी..
निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन ऍक्टिव्ह
सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव येथे दूषित पाण्यामुळे 80 नागरिकांची प्रकृती खालावली
3 जानेवारीला मुख्य पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने दूषित पाणी नळाद्वारे प्रत्येक घरात पोहचले..
हा दूषित पाणी पिण्यामुळे गावातील 80 नागरिकांना पोटदुखी, हगवण आणि उलटीचा त्रास सुरू झाला..
रुग्णामध्ये लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्तीचा समावेश..
प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याकडून गावात दोन दिवसापासून कॅम्प सुरू करून रुग्णावर तातडीने उपचार सुरू केलेत..
या कॅम्पमध्ये पहिल्या दिवशी 65 तर दुसऱ्या दिवशी 25 रुग्णावर उपचार करण्यात आल्याची माहिती..
दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या समस्येमुळे ग्रामपंचायत आणि गावाची बदनामी होऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचं स्थानिकांच आरोप..
सासवड आणि पुणे शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या बोपदेव घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. घाटात सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या आणि विस्तारीकरणाच्या कामामुळे हा मार्ग आज पासूनबुधवारपर्यंत (ता. १४) या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने घेतला आहे.
बोपदेव घाटामध्ये सध्या रस्त्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. कामाचा दर्जा आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने हा मार्ग आठवडाभर बंद ठेवण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत एकेरी वाहतुकही सुरू राहणार नाही, त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गाकडे न वळण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.
हार्बर रेल्वे उशिराने धावत आहे. प्रवाशांचा जवळपास अर्धा ते पाऊण तास खोळंबा होत आहे.
कालच्या राड्याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात ५० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल
काल जीन्सी चौकात इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर हल्ला केल्यावरून कारवाई
हल्ल्या करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
MIM ची रॅली जिन्सी चौकात पोहोचली असताना समोरून काँग्रेसच्या उमेदवारांची रॅली आली. त्यावेळी bदोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला घोषणाबाजी झाली, ज्याचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि अंडी भिरकावण्यामध्ये झाले होते. त्यानंतर हाणामारी झाली.
पोलिसांना सौम्य लाठीचार करावा लागला होता.
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या भारतीय जनता पक्षाकडून शहरात घेण्यात आलेल्या कॉर्नर बैठकिमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांसमोर जोरदार टोलेबाजी केली,मी आमदार नाही पण आमदाराचा बाप आहे इतकच नव्हे तर 2 आमदारांचा बाप आहे असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलय.शिवाय मला पाडलं तर पाडलं कल्याण निवडून आला आता घ्या कल्याण करून,2 वर्षात दोन लाख रुपये आणले नाही असं म्हणत खासदार कल्याण काळे यांना देखील टोला लगावला.त्यांनी एकही रुपया आणला नाही म्हणून मी आलो असं यावेळी शेजारी बसलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हणताच हास्यकल्लोळ उडाला.दरम्यान आम्ही तोंडाला फेस येईपर्यंत सांगू राहिलो त्यामुळे तुम्ही सुद्धा जरा तोंड उघडा आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला चहा प्यायला बोलवा आणि जालना महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आली पाहिजे असं सांगा, अशी विनंती रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना केली.सर्व राजकीय पक्षांचे लोक बोलवा आणि स्पर्धा लावा तू काय केलं म्हणून,जो हरेल त्याने कान धरून पाच उडबशा मारायच्या असं आव्हान देखील रावसाहेब दानवेंनी विरोधकांना दिलंय.
भिवंडी शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये आमदार महेश चौघुले समर्थकांचा कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्या सभेत पोलिसांच्या उपस्थिती मध्ये राडा घालण्याची घटना घडली आहे.प्रभाग क्रमांक १ मध्ये कोणार्क विकास आघाडी विरोधात भाजपाने पॅनल उभे केले आहे.भाजपा आमदार महेश चौघुले विरोधात कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील निवडणूक लढवली होती.तेव्हा पासून या दोन गटात वाद आहे.प्रभाग क्रमांक एक मध्ये माजी महापौर विलास पाटील पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील व मुलगा मयुरेश पाटील निवडणूक लढवत आहेत.त्यांच्या विरोधात भाजपा आमदार महेश चौघुले यांनी भाजपाचे पॅनल उभे केले ज्यामध्ये त्यांचा मुलगा मित चौघुले निवडणुकीच्या रिंगणात आहे.
राज्याच्या किमान तापमानात घट झालेली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात गारठा परतला आहे. आज राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.