Cancer early symptoms: शरीरात हे 5 बदल दिसले तर समजा कॅन्सरची होतेय सुरुवात; जाणून घ्या लक्षणं

Cancer early symptoms 5 body changes: कॅन्सर हा गंभीर आजार आहे, पण त्याची सुरुवातीची लक्षणं ओळखली तर वेळेत उपचार करून धोका कमी करता येतो. शरीरात काही बदल दिसू लागले तर ते कॅन्सर सुरू होण्याचे संकेत असू शकतात.
Cancer early symptoms
Cancer early symptomsSaam Tv
Published On

कॅन्सरचं नाव ऐकलं की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. कॅन्सर या शब्दाचीच अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे यावर त्याचे उपचार अवलंबून आहे. अशावेळी कॅन्सरच्या लक्षणांचं वेळेत निदान होणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यावर उपचार केले जाऊ शकतात.

कॅन्सरची गाठ होण्यापूर्वी काही छोटे छोटे संकेत आपल्या शरीरात दिसून येतात. यावेळी आपण थकवा किंवा वातावरणातील बदल समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. शरीरात कॅन्सरची सुरुवात होण्यापूर्वी कोणते बदल दिसून येतात याची माहिती घेऊया.

कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणं

कोणतंही डायटिंग किंवा एक्सरसाईजशिवाय जर तुमचं वजन कमी होत असेल तर हे कॅन्सरच्या सुरुवातीचं लक्षण असू शकतं. जर ३ महिन्यांच्या आता तुमचं ४-५ किलोपेक्षा जास्त वजन कमी होत असेल तर तातडीने डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. हे पोट, इसोफोगस किंवा फुफ्फुसांच्या कॅन्सरची सुरुवात असू शकते.

खूप जास्त थकवा

दिवसभराच्या कामानंतर तुम्हाल थकवा जाणवणं हे सामान्य आहे. मात्र पुरेशी झोप आणि आराम करून देखील तुम्हाला अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल तर हे काळजी करण्याचं कारण आहे. कॅन्सर वाढण्यासाठी शरीरातील पोषक तत्त्वाचा वापर करतो. ज्यामुळे व्यक्तीला थकवा येऊ लागतो.

Cancer early symptoms
Cervical cancer: महिलांच्या शरीरात ही 4 लक्षणं दिसली तर सर्वायकल कॅन्सरचा धोका अधिक; संकेत दिसताच करून घ्या टेस्ट

सतत वेदना होणं

वेदना शरीराचा एक असा संकेत असतो जो तुम्हाला सांगतो की, शरीरात काहीतरी बिघडलंय. उपचार करूनही वेदना कमी होत नाहीत हे याचे संकेत असतात. सतत डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे पाठदुखी कोलन किंवा प्रोस्टेट कॅन्सरशी संबंधित असू शकतं.

सतत ताप येणं

ज्यावेळी तुमचं शरीर एखाद्या संसर्गाशी लढत असतं त्यावेळी तुम्हाला ताप येतो. अशावेळी जर तुम्हाला वारंवार ताप येत असेल किंवा रात्री घाम येत असेल तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं. यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम झाल्याचं हे संकेत आहेत.

Cancer early symptoms
Liver damage symptoms: पायांमधील 'हे' बदल सांगतायत लिव्हर खराब झालंय; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

त्वचेमध्ये बदल होणं

केवळ त्वचेचा कॅन्सर नाही तर इतर कॅन्सरही तुमच्या शरीरावर परिणाम करतात. अशावेळी खाली दिलेले त्वचेवरील बदल ओळखा-

  • त्वचेचा रंग डार्क होणं

  • कावीळ किंवा डोळे पिवळे होणं

  • त्वचेवर लालसर येणं

  • शरीरावर असलेला जुना तीळाचा आकार वाढणं

Cancer early symptoms
Liver Health: चेहऱ्यावर ही ६ लक्षणं दिसली तर समजा लिव्हर होतंय खराब; फॅटी लिव्हरचाही धोका असू शकतो

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com