Cervical cancer: महिलांच्या शरीरात ही 4 लक्षणं दिसली तर सर्वायकल कॅन्सरचा धोका अधिक; संकेत दिसताच करून घ्या टेस्ट

Cervical cancer women 4 symptoms risk testing: वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, महिलांच्या शरीरात काही लक्षणं दिसल्यास ती गर्भाशयाच्या कॅन्सरची सुरुवातीची चिन्हं असू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढतो.
Cervical cancer
Cervical cancersaam tv
Published On

सर्वायकल कॅन्सर हा महिलांमध्ये होणारा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. दर वर्षाला या कॅन्सरमुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागतो. या आजाराचं वेळेत निदान न झाल्याने हा आजार अधिक धोकादायक बनतो. त्यामुळे सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची लक्षणं जाणून घेणं फार गरजेचं आहे.

सर्वायकल कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये साधारणपणे कोणतीही लक्षणं दिसून येत नाही. मात्र जसं हा आजार शरीरात वाढत जातो त्याप्रमाणे त्याची लक्षणं दिसून येतात. त्यामुळे वेळेत या आजारांची लक्षणं समजून घेणं फार गरजेचं आहे. या कॅन्सरची लक्षणं काय आहेत आणि त्यावर कशा प्रकारे उपाय केले जाऊ शकतात याची माहिती घेऊया.

Cervical cancer
Face Tells About Your Health: तुमचा चेहरा सांगतो तुम्ही आहात आजारी; हे ३ बदल दिसून आल्यास वेळीच व्हा सावधान

सर्वायकल कॅन्सरची लक्षणं काय आहेत?

असामान्य रक्तस्राव

शारीरिस संबंधानंतर, मासिक पाळी निघून गेल्यानंतर किंवा मेनोपॉजनंतर जर योनीमार्गातून रक्तस्रावत होत असेल तर हे सर्वायकल कॅन्सरचं लक्षणं मानलं जातं.

मासिक पाळीच्या सायकलमध्ये बदल होणं

पिरीयड्समध्ये जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल किंवा मासिक पाळीमध्ये ५-७ दिवसांहून अधिक दिवस रक्तस्राव होत असेल तर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

असामान्य डिस्चार्ज

वजायनातून पाणी किंवा रक्तस्राव होणं याकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये. या स्रावाला दुर्गंधी येत असेल तर हे देखील सर्वायकल कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

वेदना

पेल्विक भागात वेदना होणं किंवा शारीरिक संबंधांनंतर वेदना होत असतील तर हे देखील सर्वायकल कॅन्सरचं एक लक्षण मानलं जातं.

Cervical cancer
Copper bottle: तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? पाहा नेमकी कशी वापरावी ही बाटली?

सर्वायकल कॅन्सरपासून स्वतःचा बचाव कसा करावा?

HPV वॅक्सिन

तुमच्या डॉक्टरांकडून वॅक्सिनबाबत सल्ला घ्या. ही लस कॅन्सरचा धोका फारच कमी करतो असं मानलं जातं.

नियमित पॅप टेस्ट

वयाच्या २१ व्या वर्षानंतर नियमित पद्धतीने पॅप टेस्ट करून घेतली पाहिजे. ही टेस्ट कॅन्सर होण्याच्या पहिली स्थितीची माहिती देण्यास मदत करते. ज्यामुळे त्यावर उपचार करणंही फायद्याचं ठरतं.

Cervical cancer
Cold vs hot water: थंड पाणी की गरम पाणी प्यावं? आरोग्यासाठी नेमकं काय आणि किती फायदेशीर? वाचा

सुरक्षित शारीरिक संबंध

शारीरिक संबंध ठेवताना सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे कंडोमचा वापर आणि एकापेक्षा जास्त पार्टनर ठेऊ नये. जेणेकरून इन्फेक्शनचा धोका वाढतो.

Cervical cancer
Breast Cancer: सतत स्तनाला खाज येतेय? ब्रेस्ट कॅन्सर तर नाही ना...; डॉक्टरांनी सांगितली महिलांनी कोणती काळजी घ्यावी!

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com