Early signs of heart blockage SAAM TV
लाईफस्टाईल

Early signs of heart blockage: ब्लॉक होण्यापू्र्वी हार्ट देतं 'हे' 5 धोकादायक इशारे; चुकूनही दुर्लक्ष करू नका, महागात पडेल

Chest pain warning signs: आजकालच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये फॅट (Fat) आणि कोलेस्ट्रॉलचा थर (Plaque) जमा होऊन 'ब्लॉकेज' तयार होणं

Surabhi Jayashree Jagdish

  • हार्ट ब्लॉकेजचे पाच महत्त्वाचे लक्षण आहेत

  • छातीत वेदना हे सर्वात सामान्य लक्षण आहे

  • श्वास लागणे आणि लवकर थकवा धोकादायक आहे

आपलं हृदय सतत काम करत राहतं जेणेकरून शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत पुरेसा ऑक्सिजन आणि रक्त पोहोचतं. पण जेव्हा हृदयापर्यंत रक्त पोहचवणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा येतो त्यावेळी ही स्थिती जीवघेणी होऊ शकते. वैद्यकीय भाषेत याला कोरोनरी हार्ट डिसीज किंवा हृदयातील ब्लॉकेज म्हणतात.

मात्र अशा मोठ्या धोक्यापूर्वी शरीर काही संकेत दाखवतो. हे संकेत वेळेवर ओळखल्यास हृदयाला गंभीर आजारांपासून वाचवता येतं. यामध्ये अगदी हार्ट अटॅकपासूनही बचाव होऊ शकतो. पाहूयात हार्ट ब्लॉकेजची पाच सुरुवातीची चिन्हं जी दुर्लक्षित केल्यास धोकादायक ठरू शकतात.

छातीत वेदना

छातीत वेदना हे हार्ट ब्लॉकेजचा सर्वात सामान्य लक्षण आहे. छातीत दडपण, जळजळ किंवा ताण जाणवलेल्या वेळेस ते एंजायनाचं लक्षण असू शकतं. ही वेदना विशेषतः मानसिक तणावात असताना किंवा जड काम केल्यावर वाढतं. थोड्या विश्रांतीनंतर वेदना कमी होऊ शकतं.

श्वास घेण्यास त्रास होणं

थोडंसं चालल्यानंतर किंवा जिने चढल्यानंतर श्वास लागत तर ते हृदयापर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नसल्याचं संकेत असू शकतं. हे हार्ट ब्लॉकेजचे सुरुवातीचं लक्षण असू शकतं. म्हणून अशावेळी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.

लवकर थकवा जाणवणं

दररोजच्या साध्या कामांदरम्यानही दमणं, थकवा किंवा सतत अशक्तपणा जाणवणं म्हणजे हृदय शरीराला पुरेसा ऑक्सिजन देत नसल्याचं लक्षणं आहे. ही अवस्था हृदयात ब्लॉकेज असल्याचं महत्त्वाचं चिन्ह असू शकते.

हात, मान किंवा जबड्यात वेदना

हृदयाच्या समस्येची वेदना केवळ छातीतच नसून डाव्या हातात, पाठीमध्ये किंवा जबड्यातही जाणवू शकतात. लोक या वेदना सामान्य मांसपेशीचं दुखणं समजून दुर्लक्षित करतात पण ते देखील हार्ट ब्लॉकेजचं लक्षण असू शकतं. विशेषतः वेदना वारंवार होत असल्यास डॉक्टरांना दाखवणं अत्यंत गरजेचं आहे.

हृदयाचे ठोके अनियमित होणं

अचानक हृदय जोरात धडधडू लागणं, ठोके फडफडणं किंवा भोवळ येण्यासारखं वाटणं हलक्यात घेऊ नका. हृदयाचे अनियमित ठोके किंवा धडधड देखील हृदयात ब्लॉकेज असल्याची गंभीर सूचना असू शकते.

हार्ट ब्लॉकेज का होतं?

तज्ञांच्या मते, हार्ट ब्लॉकेजचं मुख्य कारण अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस आहे. यात धमन्यांमध्ये फॅट, कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियम यांसारख्या पदार्थांची थर बनतात. हळूहळू या थरांनी रक्तप्रवाह कमी होतो आणि ब्लॉकेज होते.

हार्ट ब्लॉकेजचे पहिले लक्षण काय असते?

छातीत दडपण किंवा वेदना हे पहिले लक्षण असते.

श्वास लागणे हृदयाचा इशारा आहे का?

होय, श्वास लागणे हृदयाचा गंभीर इशारा आहे.

हातात वेदना हृदयाशी कशी संबंधित आहे?

डाव्या हातातील वेदना हृदयाची सूचना असू शकते.

हृदयाचे ठोके अनियमित का होतात?

धमन्यांमध्ये ब्लॉकेज असल्यामुळे ठोके अनियमित होतात.

हार्ट ब्लॉकेज का होते?

धमन्यांमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉलची थरे जमा होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer: गुंतवणूकदारांची वाढली धकधक; चीनवर 100 टक्के टॅरिफ, अमेरिकेच्या निर्णयानं भारतावर काय होणार परिणाम?

Silver Purchases: बनावट चांदीच्या बारची होतेय विक्री, खरेदी करताना कोणती सावधगिरी बाळगावी? जाणून घ्या...VIDEO

Maharashtra Live News Update : अजित पवारांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, यावर जगतापांनी बोलणं टाळलं

Accident News : प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात; एकाचा मृत्यू, ११ जण जखमी

Heart Disease: लाल मांस आणि बटर नाहीतर 'हे' पदार्थ खाल्याने वाढतो हार्ट अटॅकचा धोका

SCROLL FOR NEXT