Injection for Breast Cancer: कॅन्सरचा ट्यूमर तयार होण्याचा धोका शून्य, ब्रेस्ट कॅन्सरवर नवं इंजेक्शन; नकोशा पेशींचा करणार खात्मा
सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे कॅन्सरच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. अशातच महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाणही वाढतंय. ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक महत्त्वाची कामगिरी करण्यात आलीये. यामध्ये अमेरिकेतील 'एनिक्सा बायोसायन्स' या बायोटेक्नोलॉजी कंपनीने एक लस विकसीत केली आहे. या लसीच्या प्राथमिक टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी ठरलीये. या कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही लस ट्यूमर वाढण्याआधीच त्याला रोखू शकते. त्यामुळे केवळ उपचारच नाही तर तर संभाव्य ब्रेस्ट कॅन्सरचाही बचावही शक्य होतो.
एनिक्सा बायोसायन्सचे सीईओ अमित कुमार यांनी 'वॉग इंडिया'ला दिलेल्या माहितीनुसार, ही लस शरीरातील प्रतिकारशक्तीला एक्टिव्ह करतं. ती कॅन्सरच्या पेशी ओळखून नष्ट करण्याचं काम करते. लस मिळाल्यानंतर शरीराची इम्युन सिस्टिम कॅन्सरच्या संभाव्य पेशींना पटकन ओळखून त्यांना नष्ट करते. या लसीचे तीन डोस दोन आठवड्यांच्या अंतराने दिले जातात.
ही लस 'अल्फा लॅक्टअल्ब्युमिन' या प्रोटीनवर लक्ष ठेवून कार्य करतं, जे प्रामुख्याने ब्रेस्ट फिडींगच्या काळात तयार होतं. परंतु ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर (TNBC) असलेल्या सुमारे ७०% रुग्णांमध्ये हे प्रोटीन आढळून येतं. त्यामुळे ही लस या धोकादायक प्रकारावरील संभाव्य उपाय मानली जातेय.
काय आहे ही नेमकी लस?
ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राधेश्याम नायक यांच्या मते, ही लस एका प्रकारची इम्युनोथेरपी आहे. त्यामुळे पारंपरिक लसींपेक्षा वेगळी आहे. ही लस संसर्गजन्य घटकांऐवजी शरीरातील कॅन्सरशी संबंधित प्रोटीनच्या पेशींना लक्ष्य करतं.
चाचण्या प्राथमिक टप्प्यात
अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे डॉ. प्रशांत मेहता यांच्या सांगण्यानुसार, ही लस ३५ महिलांवर प्राथमिक चाचणीसाठी वापरण्यात आली होती. कॅन्सरला ओळखण्याच्या शरीराच्या क्षमतेत अडथळा आणणाऱ्या ‘इम्युन इव्हेजन’वर ही लस काम करते. म्हणजे कॅन्सर होण्याआधीच शरीराला सतर्क करते.
पीएसआरआय रुग्णालयातील डॉ. अमित उपाध्याय यांनी ही लस शास्त्रीयदृष्ट्या विश्वासार्ह असल्याचं म्हटलंय. ही लस अजून प्राथमिक टप्प्यात असली तरी तिचा अभ्यास काटेकोर चाचण्यांद्वारे सुरू आहे. क्लिव्हलँड क्लिनिकसारख्या संस्थेमार्फत यावर परिक्षण सध्या सुरु आहे, असंही ते म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.