Preeclampsia symptoms: गरोदरपणात होणारा उच्च रक्तदाब बाळासाठी ठरतो धोकादायक; महिलांमध्ये काय दिसून येतात याची लक्षणं?

High blood pressure in pregnancy symptoms woman: गरोदरपणात उच्च रक्तदाब ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. जी आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते. याला सामान्यतः 'गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब' किंवा 'प्री-एक्लॅम्पसिया' असं म्हटलं जातं.
High blood pressure in pregnancy symptoms woman
High blood pressure in pregnancy symptoms womansaam tv
Published On

प्री-एक्लेम्पसियाच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून प्रसूतीपूर्व काळजी घेणं आणि जीवनशैलीतील संबंधीत विकारांना तोंड देणं गरजेचं आहे. गर्भवती महिलांना गर्भधारणेच्या सुरुवातीला प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करत नियमित तपासणी आणि प्रसूतीपूर्व काळजी घेतली पाहिजे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

गर्भवती महिलांमध्ये प्री-एक्लेम्पसियाच्या प्रकरणांमध्ये वाढ होतेय. यावर वेळीच उपचार न केल्यास, आई आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्री-एक्लेम्पसिया हा गर्भधारणेशी संबंधित विकार आहे ज्याच उच्च रक्तदाबाची समस्या दिसून येते. गर्भधारणेच्या 20 व्या आठवड्यानंतर हा विकसित होतो.

वेळीच निदान, रक्तदाबाचं वेळोवेळी निरीक्षण आणि उपचाराने ही परिस्थिती नियंत्रणात ठेवता येते. ही एक अधिक गंभीर आणि जीवघेणी गुंतागुंत आहे. प्री-एक्लेम्पसिया ही केवळ गर्भधारणेची गुंतागुंत नसून ज्या महिलांना प्री-एक्लेम्पसिया झाला आहे त्यांना भविष्यात उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक सारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका अधिक असतो.

गर्भधारणेदरम्यान प्री-एक्लेम्पसियामध्ये उच्च रक्तदाब आणि अवयवांचे नुकसान होण्याची चिन्हं, बहुतेकदा मूत्रपिंडांवर याचा परिणाम होतो. हे सहसा गर्भधारणेच्या २० आठवड्यांनंतर होते आणि ते प्री-एक्लॅम्पसियामध्ये वाढू शकते. यामध्ये आकडी येणं तसंच आई आणि बाळ दोघांनाही गंभीर धोका निर्माण होतो. उच्च रक्तदाबामुळे लघवीमध्ये प्रथिने, तीव्र डोकेदुखी, अंधुक दृष्टी किंवा ओटीपोटात वेदना यासारखी लक्षणे दिसून येतात.

पहिल्यांदाच गर्भवती असणं, जुळे किंवा तिळी बाळ असणं, जास्त वजन असणं किंवा जुनाट उच्च रक्तदाबाची समस्या, मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा आजार यासारख्या आधीच अस्तित्वात असलेल्या आजारांमुळे ही स्थिती उद्भवू शकते. प्री-एक्लेम्पसियाचा कौटुंबिक इतिहास देखील याचा धोका वाढवतो. उपचार न केल्यास, प्री-एक्लेम्पसियामुळे अवयव निकामी होणं, अकाली प्रसूती यासारख्या अनेक गुंतागुंत होऊ शकतात.

पुण्यातील लुल्लानगरमधील मदरहुड हॉस्पीटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुचेता पार्टे यांनी सांगितलं की, यासाठीच गर्भवती मातांनी नियमित प्रसूतीपूर्व तपासणी करणं, वैद्यकीय सल्ल्याचं पालन करणं गरजेचे आहे. सर्व गर्भधारणेपैकी सुमारे ५ ते ८ टक्के प्रसूतीवर याचा परिणाम होतो. प्री-एक्लेम्पसिया (PE) हा 5% माता मृत्युदरास जबाबदार आहे. तरुण वयोगटातील उच्च रक्तदाबाच्या वाढत्या समस्यांसह, वेळीच निदान अत्यंत महत्वाचे आहे. वेळीच उपचार न केल्यास, आई आणि बाळ दोघांवरही ते परिणाम करू शकते आणि सुपरइम्पोज्ड प्रेग्नन्सी-इंड्युस्ड हायपरटेन्शन (PIH) मध्ये प्रगती करू शकते.

High blood pressure in pregnancy symptoms woman
Dengue symptoms monsoon : पावसाळ्यात वाढतेय डेंग्यूच्या रूग्णांची संख्या; पावसाळी आजाराची लक्षणं ओळखून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

डॉ. सुचेता पार्टे पुढे सांगतात की, गर्भधारणेच्या २० व्या आठवड्यानंतर रक्तदाब मोजणे आणि मूत्र चाचण्यांद्वारे प्रथिन पातळी तपासून प्री-एक्लॅम्पसियाचे निदान केले जाते. प्री-एक्लॅम्पसिया आई आणि बाळ दोघांनाही प्रभावित करते. जर गर्भवती मातांमध्ये रक्तदाब नियंत्रणात आणले नाही तर ते आकुंचन, दुखापत, श्वासोच्छवास आणि मूत्रपिंड, यकृताचे नुकसान करु शकते किंवा त्यामुळे अवयव निकामी होऊ शकतो. बाळांमध्ये, यामुळे वाढ मंदावणे, गर्भाशयात मृत्यू किंवा अकाली प्रसूती होऊ शकते. नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे आणि रुग्णांनी डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि ओटीपोटात उजव्या बाजूस दुखणे यासारख्या लक्षणांवर लक्ष ठेवले पाहिजे.

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निशा घुमरे सांगतात की, प्री-एक्लॅम्पसिया ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे जी गर्भधारणेदरम्यान, सहसा २० आठवड्यांनंतर होऊ शकते. यामुळे उच्च रक्तदाब होतो आणि यकृत आणि मूत्रपिंडासारख्या गर्भवती मातेच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. वेळेवर उपचार न केल्यास, यामुळे आई आणि बाळ दोघांसाठीही गंभीर समस्या उद्भवू शकतात, जसे की अकाली प्रसूती, कमी वजनाचे बाळ किंवा जीवघेण्या समस्या उद्भवतात. म्हणूनच वेळीच निदान करणे खूप गरजेचे आहे.

High blood pressure in pregnancy symptoms woman
High cholesterol pain symptoms : रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरातील 'या' भागात होतात वेदना; वेळीच लक्ष देणं ठरेल फायद्याचं

गर्भधारणेदरम्यान नियमित तपासणी केल्याने डॉक्टरांना प्रीक्लेम्पसियाची सुरुवातीची लक्षणे आढळण्यास मदत होते. बऱ्याच महिलांना सुरुवातीला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, म्हणून नियमित रक्तदाब आणि लघवीच्या चाचण्या या वेळीच निदानास मदत करतात. जर प्रीक्लेम्पसियाचे वेळेवर निदान झाले तर विश्रांती, औषधोपचार आणि देखरेख यासारख्या योग्य काळजीने ते व्यवस्थापित केले जाऊ शकते.

High blood pressure in pregnancy symptoms woman
Foods to avoid before bed : झोपण्यापूर्वी 'हे' 4 पदार्थ खाऊच नका! खाल्ले तर काहीही करा, झोप लागणारच नाही

काही प्रकरणांमध्ये, डॉक्टर सुरक्षिततेसाठी बाळाची वेळीच प्रसूती करण्याचा निर्णय घेऊ शकतात, परंतु चांगल्या उपचारांनी, आई आणि बाळ दोघेही बरे होऊ शकतात. गर्भवती महिलांनी हात किंवा चेहऱ्यास अचानक सूज येणे, डोकेदुखी, दृष्टीदोष किंवा जलद वजन वाढणे यासारख्या लक्षणांबद्दल जागरूक असले पाहिजे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच तपासंनी आणि योग्य काळजी घेतल्यास, आपण आई आणि बाळ दोघांनाही सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकतो, असंही डॉ. निशा यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com