Breast Cancer
Breast CancerSaam TV

Breast Cancer: गाठ पे ध्‍यान! स्वयंपाकातील बारकाईप्रमाणे स्तनांमधील छोटे बदल ओळखा; कॅन्सरला हरवण्यासाठी हटके मोहीम

Breast cancer signs awareness campaign : कॅन्सरमध्ये घेतल्‍या जाणाऱ्या केअरमधील अडथळ्यांना दूर करणं आवश्‍यक आहे. लवकर निदान झाल्‍यास बहुतांश केसेसमध्‍ये प्रभावीपणे उपचार करता येऊ शकतो.
Published on

देशभरात कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तर महिलांमध्ये स्तनांच्या कॅन्सरच्या रूग्णांची संख्या वाढतेय. आकडा पाहिला तर भारतात दर चार मिनिटाला एका महिलेला स्‍तनांच्या कॅन्सरचं निदान होतंय. यामध्ये कॅन्सरमध्ये घेतल्‍या जाणाऱ्या केअरमधील अडथळ्यांना दूर करणं आवश्‍यक आहे. लवकर निदान झाल्‍यास बहुतांश केसेसमध्‍ये प्रभावीपणे उपचार करता येऊ शकतो.

एका सर्व्हेक्षणातून असं समोर आलंय की, भारतातील ७५ टक्‍के महिला तपासणी करणं टाळतात किंवा नकार देतात. तर ६० टक्‍के महिलांना मित्रमैत्रिणी व कुटुंबासोबत स्‍तनाच्या कर्करोगाबाबत चर्चा करण्‍यास अस्‍वस्‍थ वाटतं. अशातच 'गाठ पे ध्‍यान' (गाठींवर लक्ष केंद्रित) मोहिमेच्‍या माध्‍यमातून टाटा ट्रस्‍ट्सने महिलांना ज्‍याप्रमाणे त्‍या त्‍यांच्‍या स्‍वयंपाकामध्‍ये बारकाईने लक्ष देतात अगदी त्याचप्रमाणे गाठींसाठी त्‍यांच्‍या स्‍तनांची तपासणी करण्‍याकडे लक्ष देण्‍यास प्रेरित केलंय. यासह टाटा ट्रस्‍ट्सने स्‍वयंपाकामधील कामामधून आत्‍मनिरीक्षण आणि सक्षमीकरणाला चालना दिली.

Breast Cancer
Right Weight For Age : वयोमानानुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? कसं मोजाल वय आणि वजनाचं गणित, पाहा चार्ट

मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्‍या या मोहिमेचा नुकतंच 'गाठ पे ध्‍यान' कूकबुक लाँच करण्यासह शेवट झाला. या प्रयत्‍नामध्‍ये पाककलांचा संग्रह आहे, ज्‍याचा 'परिवर्तनाच्‍या दिशेने वाटचाल, एका वेळी एक रेसिपी' हा उद्देश आहे. ऑनलाइन आणि मोफत डाऊनलोडसह उपलब्‍ध असलेलं हे कूकबुक पाककलांसह विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आलंय.

तज्ञ भारतीय शेफ्स-टर्न-कॅम्‍पेन-अॅम्‍बेसडर्स जसं मास्‍टरशेफ्स शिप्रा खन्‍ना व सांता सरमा, त्याचप्रमाणे शेफ्स अनन्‍या बॅनर्जी, सैलाजा ऐचुरी, प्रिया गुप्‍ता, वरप्रसाद कार्त्‍यायेनी आणि लैबा अशरफ यांच्‍याकडून पाककलांचा स्रोत मिळवण्‍यात आला आहे.

Breast Cancer
Cancer Treatment: कॅन्सरला रिव्हर्स करणारं 'स्विच' सापडलं, आता कॅन्सरच्या जीवघेण्या पेशी होणार निरोगी

टाटा ट्रस्‍ट्सच्या शिल्‍पी घोष यांनी आयोजित केलेल्‍या पॉडकास्‍ट मध्‍ये प्रतिष्ठित न्‍यूट्रिशनिस्‍ट रूजुता दिवेकर आणि प्रख्‍यात ब्रेस्‍ट कॅन्‍सर ऑन्‍कोलॉजिस्‍ट डॉ. राजेंद्र बडवे यांनी या कूकबुकच पुनरावलोकन केलं. यामध्ये स्‍तनांचा कॅन्सर आणि महिलांचे स्‍वास्‍थ तसंच पोषण यामधील परस्‍परसंबंधाचा शोध घेण्‍यात आला. हे कूकबुक शेफ संजीव कपूर असलेली 'सोशल एक्‍स्‍पेरिमेंट' जाहिरात 'गाठ पे ध्‍यान'चे विस्‍तारीकरण आहे, जी गेल्‍या वर्षी ट्रस्‍ट्सने लाँच केली होती.

Breast Cancer
Momos Disadvantages: चवीने मोमोज खाताय तर 'या' आजारांनाही देताय निमंत्रण; विचारही केला नसेल इतके धोकादायक आहेत मोमोज

याला पूरक आणखी एक जनजागृती करणारी जाहिरात होती, ज्‍यामध्‍ये मुंबईतील महिला स्‍ट्रीट-फूड विक्रेत्‍या होत्‍या. या जाहिरातीमधून लवकर निदान आणि स्‍वत:हून स्‍तनाची तपासणी करण्‍याच्‍या गरजेचं महत्त्व दाखवण्‍यात आलंय. या दृष्टिकोनामधून निदर्शनास आले की, आहारामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा अडथळा टाळणं हे त्‍यांच्‍या उदरनिर्वाहासाठी आवश्‍यक आहे. पण स्‍तनांमधील गाठींमुळे कॅन्सर होऊ शकतो याबाबत मर्यादित प्रमाणात जागरूकता आहे.

Breast Cancer
Liver damage: लिव्हर खराब झाल्यास पायांमध्ये होतात 'हे' मोठे बदल; अधिकतर लोकं समजतात साधारण

मुंबई आणि इतर प्रतिष्ठित प्रादेशिक वैद्यकीय संस्‍थांमधील डॉक्‍टरांच्‍या पाठिंब्‍यासह प्रत्‍यक्षात मोहिम राबवत ट्रस्‍ट्सने विविध कॉर्पोरेट्समध्‍ये स्‍तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती केली. यामध्ये तपासणी शिबिरं राबवली, ज्‍यामुळे अधिक केसेसची तपासणी झाली, ज्‍याकडे अन्‍यथा दुर्लक्ष कऱण्यात येतं. 'गाठ पे ध्‍यान' मोहिमेला भारतात व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर विविध मान्‍यता मिळाल्‍या आहेत, जसे प्रोवोक ग्‍लोबल क्रिएटिव्‍ह इंडेक्‍स २०२४ मध्‍ये दुसरा क्रमांक मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com