Breast cancer vaccine: ही लस ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे संपवू शकते; वाचा शरीरात कसा होतो बदल?

How the new breast cancer vaccine works: स्तनाच्या कर्करोगावर सध्या तयार होत असलेल्या नवीन प्रायोगिक लसीमुळे उपचाराच्या क्षेत्रात मोठी आशा निर्माण झाली आहे. ही लस शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला कर्करोगाच्या पेशी ओळखायला आणि त्यांचा खात्मा करायला शिकवते
Cancer Vaccine
Cancer VaccineSaam Tv
Published On
Summary
  • ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्या मृत्यूचा प्रमुख कारण आहे

  • कॅन्सर लसी शरीराला कॅन्सर पेशी ओळखण्यास शिकवतात

  • Vokevax आणि अल्फा-लॅक्टाल्ब्यूमिन लसी विकसित करण्यात आल्या आहेत

सध्याच्या काळात अनेक महिला ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देताना दिसतात. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या अहवालानुसार, जगातील प्रत्येक 20 पैकी 1 महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. अनेक देशांमध्ये हे महिलांच्या मृत्यूचं एक मुख्य कारण बनलंय. परंतु विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता नवीन आशा दिसून येतेय. शास्त्रज्ञ एका खास लसीवर काम करत आहेत जी भविष्यात ब्रेस्ट कॅन्सरला मूळपासून थांबवू शकणार आहे. काही वर्षांत ही लस कॅन्सरच्या उपचारांचा महत्त्वाचा भाग बनेल अशी शक्यता आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या कॅन्सर व्हॅक्सीन संस्थेच्या प्रमुख डॉ. नोरा डीसीस यांनी माध्यमांना सांगितलं की, आपण एक महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. त्यांच्या मते, पुढील दहा वर्षांत कॅन्सर लसीकरण सामान्य उपचार पद्धतीचा भाग होऊ शकते.

व्हॅक्सीन कॅन्सरवर कशी काम करते?

गोवर, पोलिओ किंवा मेनिन्जाइटिससारख्या रोगांपासून बचावासाठी आपण लस घेतो. या लसी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीराला आजाराविरुद्ध कसं लढायचं ते शिकवतात. कॅन्सरच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे, कारण कॅन्सर बाहेरील जंतूने होत नाही तर शरीरातील काही पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात. त्यामुळे कॅन्सरसाठी लस बनवणं खूपच कठीण आणि महाग असते. अनेक वेळा प्रत्येक रुग्णाच्या ट्युमरनुसार वेगळी लस तयार करावी लागते.

Cancer Vaccine
Ovarian cancer: भारतातील महिलांमध्ये वाढतंय अंडाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण; सोप्या उपायांनी करू शकता प्रतिबंध

कॅन्सर पेशींमध्ये काही विशिष्ट प्रोटीन असतात जे सामान्य पेशींमध्ये नसतात. शास्त्रज्ञ हे प्रोटीन ओळखून त्यांवर आधारित लस तयार करतात. ही लस रोगप्रतिकारक शक्तीला शिकवतं की, त्या विशिष्ट कॅन्सर पेशींना ओळखून त्यांच्यावर हल्ला करावा. अशा प्रकारे शरीर स्वतःच कॅन्सरशी लढायला शिकतं.

Cancer Vaccine
Study reveals heart disease risk: 'या' 4 टाईपच्या लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोक येण्याचा धोका अधिक; अभ्यासातून 99% अधिक लोकांना त्रास असल्याचं उघड

आता पर्यंत कोणत्या लसी विकसित झाल्या आहेत?

वोकवेक (Vokevax) व्हॅक्सीन

या लसीची चाचणी त्या महिलांवर केली जाते हे ज्यांना HER2 पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आहे. HER2 हे एक प्रोटीन आहे जे कॅन्सर पेशींची वाढ वेगवान करते. रुग्णांना कीमोथेरपी आणि शस्त्रक्रियेसोबत ही लस दिली जाते. सुरुवातीच्या निष्कर्षांनुसार ही लस प्रभावी आहे.

अल्फा-लॅक्टाल्ब्यूमिन व्हॅक्सीन

ही पेप्टाइड-आधारित लस विशेषतः ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर (TNBC) साठी तयार केली आहे. TNBC हा ब्रेस्ट कॅन्सरचा सर्वात धोकेदायक प्रकार मानला जातो. ही लस ब्रेस्ट मिल्कमध्ये आढळणाऱ्या एका विशिष्ट प्रोटीनला लक्ष्य करते, जो TNBC रुग्णांमध्ये आढळतो. ही लस शरीराला ते प्रोटीन ओळखून त्यावर कसा हल्ला करावा हे शिकवते.

Cancer Vaccine
Breast cancer prevention:'या' एका साध्या आणि सोप्या उपायाने टाळता येतो ब्रेस्ट कॅन्सर; 10% ते 25% धोका कमी होत असल्याचं अभ्यासातून समोर

लसींचे सुरुवातीचे परिणाम किती प्रभावी आहेत?

क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या 70% महिलांच्या रोगप्रतिकारक शक्तीने कॅन्सर पेशी ओळखून त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये साइड इफेक्टही खूप कमी आढळले. उदाहरणार्थ, डायना इनिस नावाच्या एका महिलेला स्टेज-3 कॅन्सर होता. लस घेतल्यानंतर ती मागील 3 वर्षांपासून कॅन्सरमुक्त आहे.

Cancer Vaccine
Foods to clean heart vessels: 'या' पद्धतींनी लगेच वितळेल धमन्यांमध्ये जमा झालेली चरबी; हृदयाच्या रक्तवाहिन्या होतील एकदम स्वच्छ

सध्या ही लस फेज-2 ट्रायलमध्ये आहे. याचे प्राथमिक निकाल सकारात्मक आहेत. पण अजून मोठ्या प्रमाणावर चाचण्या कराव्या लागतील. 2026 मध्ये फेज-2 चाचणीचा पुढचा टप्पा सुरू होईल, ज्यात प्लेसिबो ग्रुपचा समावेश असणार आहे. नंतर फेज-3 चाचणी यशस्वी झाल्यानंतरच लसीला परवाना मिळून ती बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहे.

Cancer Vaccine
ICMR Indian diet study: भारतीयांच्या थाळीतच लपलंय आजारांचं मूळ; ICMR च्या अभ्यासात धक्कादायक तथ्य
Q

ब्रेस्ट कॅन्सरची लस कशी काम करते?

A

लस रोगप्रतिकारक शक्तीला कॅन्सर पेशी ओळखण्यास शिकवते.

Q

Vokevax लस कोणासाठी आहे?

A

HER2 पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या महिलांसाठी आहे.

Q

TNBC म्हणजे काय?

A

ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर हा धोकादायक प्रकार आहे.

Q

लसीचे साइड इफेक्ट्स कसे आहेत?

A

साइड इफेक्ट्स खूप कमी आढळले आहेत.

Q

ब्रेस्ट कॅन्सर लस कधी उपलब्ध होईल?

A

फेज-3 यशस्वी झाल्यानंतरच लस बाजारात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com