Ovarian cancer: भारतातील महिलांमध्ये वाढतंय अंडाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण; सोप्या उपायांनी करू शकता प्रतिबंध
चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये ओव्हेरियन कॅन्सरचाही समावेश आहे. हा कॅन्सर अंडाशयात होतो. महिला शरीरातील अंडाशय हा महत्त्वाचा अवयव असून यामध्ये अंडी तयार होतात. ही अंडी फॅलोपियन ट्यूबच्या माध्यमातून गर्भाशयात जातात. गर्भाशयात गेल्यानंतर ही अंडी फलित होतात. त्यामुळे याच अवयवामध्ये कोणत्याही प्रकारता कॅन्सर विकसीत झाला तर त्याला ओव्हेरियन कॅन्सर म्हटलं जातं.
किती आहे ओव्हेरियन कॅन्सरचं प्रमाण
ओव्हेरियन कॅन्सर हा महिलांना होणार कॅन्सर असून देशात याचं प्रमाण अधिक आहे. हा कॅन्सर भारतातील तिसरा सर्वात सामान्य स्त्रीरोग कॅन्सर आहे. भारतामध्ये दर १,००,००० महिलांमागे अंडाशयाच्या कॅन्सरच्या जवळपास ४.३ प्रकरणं आढळून येतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यावर वेळीच निदाण होणं शक्य असून असं झाल्यास ओव्हेरियन कॅन्सरवर मात करण्याची शक्यता वाढते.
या कॅन्सरला कसा प्रतिबंध करावा?
आजार टाळण्यासाठी आहारात बदल करणं गरजेचं आहे. त्यामुळे आहारामध्ये बदल करून तुम्ही ओव्हेरियन कॅन्सर रोखता येऊ शकतं. यासाठी तुम्हाला दररोजच्या आहारात प्रोटीन पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करावा लागतो. याशिवाय फास्ट फूडचं सेवन टाळणं फायदेशीर ठरतं. व्यायाम करून बैठी जीवनशैली टाळावी लागणार आहे.
ज्या महिलांना मद्यपान किंवा धुम्रपानाची सवय आहे त्यांनी वेळोवेळी काही हेल्थ टेस्ट करून घ्याव्यात. ज्या महिलांच्या कुटुंबात यापूर्वी कॅन्सरची हिस्ट्री असेल त्यांनी अधिक काळजी घ्यायची गरज आहे. त्याचप्रमाणे वजन नियंत्रित ठेवल्याने ओव्हेरियन कॅन्सरचा धोका कमी होतो.
साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या ऑन्को सर्जन आणि मेडिकल डायरेक्टर डॉ.तेजल गोरासिया यांनी सांगितलं की,सतत अपचन होणं, ओटीपोटात दुखणं, भूक मंदावणं, बद्धकोष्ठता, अशी या कॅन्सरची लक्षणे आहेत. जर तुम्हाला अचानकपणे हे त्रास सुरू झाले असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. स्तनपान केल्याने आईला भविष्यात अंडाशयाचा, स्तनाचा व गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.
३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी सीए-१२५ रक्त आणि ट्रान्सव्हॅजायनल अल्ट्रासाऊंड (TVUS) सोबत रोमा (ROMA)चा निदापर्याय तसेच ओटीपोटात दुखणे, असह्य वेदना आणि सूज येणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. २५ वर्षांनंतरच्या स्त्रियांनी नियमितपणे गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करुन घेणे आणि योग्य वेळी निदान आणि उपचार करणे गरजेचे असल्याच माहिती डॅा गोरासिया यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.