Benefits of Eating Saunf Saam TV
लाईफस्टाईल

Benefits of Eating Saunf : जेवणानंतर तुम्ही बडिशेप खाताय? आरोग्याला मिळणारे 'हे' गुणकारी फायदे कधीच वाचले नसतील!

Fennel Seeds Benefits : बडिशेप खाल्ल्याने आपल्या तोंडाची दुर्गंधी कमी होते. इतकेच नाही तर आपल्या आरोग्यावर सुद्धा याचा चांगला परिणाम होतो.

Ruchika Jadhav

माउथ फ्रेशनर म्हणून अनेक व्यक्ती बडिशेप खातात. जेवणात काही व्यक्ती नॉनव्हेज, कांदा आणि विविध पदार्थ खातात. जेवण झाल्यावर काहीवेळा तोंडाचा वास येतो. तोंडाचा वास येत असल्याने व्यक्ती मुखवास म्हणून बडिशेप खातात. बडिशेप खाल्ल्याने आपल्या तोंडाची दुर्गंधी कमी होते. इतकेच नाही तर आपल्या आरोग्यावर सुद्धा याचा चांगला परिणाम होतो. मात्र अनेक व्यक्तींना बडिशेपचे अस्सल फायदे माहिती नाहीत. त्यामुळे आज त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

पचनासाठी उपयुक्त

विविध पदार्थ खाल्ल्यावर त्यांचे पचन व्हावे यासाठी बडिशेप खाल्ली पाहिजे. बडिशेप खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पोट फुगणे, अपचन आणि गॅससारख्या समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे प्रत्येक हॉटेलमध्ये देखील जेवण झाल्यावर बडिशेप खाण्यासाठी दिली जाते.

डोळ्यांची दृष्टी सुधारते

बडिशेपमध्ये व्हिटॅमीन ए सुद्धा असतं. त्यामुळे याचे सेवन केल्याने आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. बडिशेप खाणाऱ्या व्यक्तीचे डोळे स्वच्छ आणि निरोगी राहतात. तसेच बडिशेप खाणाऱ्या व्यक्तींना कधीच मोतीबिंदू होत नाही.

मासिक पाळी

मासिक पाळीमध्ये महिलांना पोट आणि कंबर दुखण्याच्या समस्या जाणवतात. बडिशेपमध्ये फायटोएस्ट्रोजेन असते त्यामुळे या वेदना कमी होतात. तसेच इस्ट्रोजेन हार्मोनसारखे घटक बडिशेपमध्ये असल्याने मासिक पाळी नियमीत येण्यासाठी सुद्धा मदत होते.

वजन कमी करण्यास मदत

बडिशेपमध्ये असलेल्या व्हिटॅमीनमुळे मेटाबॉलिक रेट वाढतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

त्वचा

बडिशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. तसेच याने पोटही साफ होते. त्यामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारचे अॅक्ने किंवा पिंपल्स येत नाहीत. त्वाच कोमल राहते.

टीप : ही सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

SCROLL FOR NEXT