Shruti Vilas Kadam
नारळाच्या तेलामुळे त्वचेवर एक थर तयार होतो. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल उपयोगी ठरू शकते.
मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते. यामध्ये त्वचेला ओलावा देणारे घटक असतात. त्यामुळे हिवाळ्यात मॉइश्चरायझर वापरणे फायदेशीर ठरते.
ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे, ते चेहऱ्यावर थोडे नारळाचे तेल लावू शकतात. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. मात्र, आधी हातावर थोडे तेल लावून तपासून पाहावे.
ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी चेहऱ्यावर नारळाचे तेल लावणे टाळावे. कारण यामुळे काही लोकांच्या चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात. अशावेळी हलके आणि ऑइल फ्री मॉइश्चरायझर वापरावे.
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. कोरड्या त्वचेसाठी घट्ट क्रीम वापरता येते, तर तेलकट त्वचेसाठी हलके जेल मॉइश्चरायझर चांगले ठरते. त्यामुळे त्वचेचा प्रकार ओळखूनच मॉइश्चरायझर निवडावे.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर थोडे नारळाचे तेल घ्या आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. मात्र, चेहऱ्यावर मुरुम येत असतील तर नारळाचे तेल लावणे टाळावे.
हिवाळ्यात चेहरा धुतल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही. तसेच घराबाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरू नका. नियमित काळजी घेतल्यास त्वचा मऊ आणि तजेलदार राहण्यास मदत होते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.