Cheese Cake Recipe: बेकरीसारखा मऊ, क्रीमी आणि चविष्ट चीज केक घरी बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

चीज केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

क्रीम चीज – २०० ग्रॅम, बिस्किटे – १५ ते २०, बटर – ४ चमचे, पिठीसाखर – अर्धा कप, फ्रेश क्रीम – अर्धा कप, व्हॅनिला इसेन्स – अर्धा चमचा, लिंबाचा रस – १ चमचा, कॉर्नफ्लोअर – १ चमचा, चीज केक बनवण्याची ७ सोपी पद्धत

Cheese cake

बिस्किटांचा बेस तयार करा

सर्वप्रथम बिस्किटांचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये त्यांची पावडर तयार करा. त्यात वितळलेले बटर घालून चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण केकच्या भांड्यात पसरवून चमच्याने दाबून घ्या.

Cheese Cake | Saam Tv

क्रीम चीज तयार करा

एका भांड्यात क्रीम चीज घ्या. ते चमच्याने किंवा बीटरने चांगले फेटून घ्या. क्रीम चीज मऊ आणि गाठी नसलेले झाले पाहिजे.

Cheesecake Recipe | Google

साखर आणि क्रीम मिक्स करा

आता क्रीम चीजमध्ये पिठीसाखर आणि फ्रेश क्रीम घाला. हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगले फेटून घ्या. यामुळे केकला छान क्रीमी चव येते.

Cheese Cake

व्हॅनिला इसेन्स आणि लिंबाचा रस घाला

तयार मिश्रणात व्हॅनिला इसेन्स, लिंबाचा रस आणि कॉर्नफ्लोअर घाला. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा. मिश्रणात गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या.

Cheese Cake

मिश्रण केकच्या भांड्यात ओता

आता बिस्किटांचा बेस तयार असलेल्या भांड्यात चीजचे मिश्रण ओता. भांडे हलकेच टॅप करा. त्यामुळे मिश्रणातील हवेचे बुडबुडे बाहेर पडतील आणि केक व्यवस्थित तयार होईल.

Cheese Cake

केक बेक करा

आधी गरम केलेल्या ओव्हनमध्ये १६० ते १७० अंश सेल्सिअस तापमानावर साधारण ४० ते ५० मिनिटे केक बेक करा. केक सेट झाल्यानंतर ओव्हन बंद करा आणि तो थंड होऊ द्या.

Cheese Cake | Saam Tv

थंड करून सर्व्ह करा

केक पूर्ण थंड झाल्यानंतर ४ ते ६ तास फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर भांड्यातून बाहेर काढून त्याचे तुकडे करा. वरून स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा चॉकलेट सिरप घालून सर्व्ह करा.

Cheese Cake | Saam Tv

Carrot Differnce: लाल गाजर की नारंगी गाजर? आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर; जाणून घ्या दोघांमधील ७ फरक

Red Carrot vs Orange Carrot | Saam Tv
येथे क्लिक करा