8 राज्यात जोरदार पाऊस, ८० किमी वेगाने वादळी वारे अन् दाट धुकं; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

IMD Heavy Rain Alert For 8 States On November 25: देशातील ८ राज्यांना २५ नोव्हेंबरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ताशी ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून उत्तर भारतात दाट धुक्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने विशेष सूचना दिल्या आहेत.
WeatherUpdate
WeatherUpdateSaam tv
Published On: 

देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २५ नोव्हेंबर रोजी देशातील ८ राज्यांना हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी ६० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसासह विजांचा कडकडाट आणि वीज पडण्याचा धोकाही वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

WeatherUpdate
Election: मोठी बातमी! भाजपची आणखी एका पक्षासोबत युती, अमित शाह यांची दिल्लीत घोषणा

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. केरळ आणि माहेमध्येही २७ नोव्हेंबरपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमा भागात २८ नोव्हेंबरपर्यंत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

WeatherUpdate
Election: यूपी निवडणुकीत एकनाथ शिंदेंची एन्ट्री! ३५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी; भाजपची डोकेदुखी वाढणार?

कोणत्या राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट?

आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, अंदमान-निकोबार बेटे, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीप या आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाची शक्यता आहे.

दिल्लीत २५ नोव्हेंबरला धुक्याची शक्यता

राजधानी दिल्लीत २५ नोव्हेंबर रोजी कोरडे हवामानाचा अंदाज आहे. मात्र, सकाळच्या वेळी काही भागांमध्ये हलके धुके किंवा आभट वातावरण राहू शकते. दिल्लीत कमाल तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ९ ते ११ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

WeatherUpdate
BJP MLA : मध्यरात्री थरार! भाजप आमदारांच्या ताफ्यातील २ गाड्यांना स्कॉर्पिओची जोरदार धडक; गाडी रस्त्यावर पलटली अन्...

उत्तर प्रदेशात २५ नोव्हेंबरला धुक्याचा इशारा

उत्तर प्रदेशमध्ये २५ नोव्हेंबर रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशात पावसाचा कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, २५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते दाट धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बिहारमध्ये २५ नोव्हेंबरला कसे असेल हवामान?

बिहारमध्ये २५ नोव्हेंबर रोजी हवामान सर्वसाधारणपणे कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील कोणत्याही भागासाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. हवामान विभागाच्या सात दिवसांच्या अंदाजानुसार, २५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये दाट धुक्याचा इशारा

पंजाबमध्ये २५ नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहणार आहे. मात्र, २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान राज्यात दाट धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी होऊ शकते. याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेशात दाट धुक्याची शक्यता

हिमाचल प्रदेशात २५ नोव्हेंबर रोजी पाऊस किंवा बर्फवृष्टीचा कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मात्र, २५ आणि २६ नोव्हेंबरदरम्यान काही भागांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळी दृश्यमानतेवर परिणाम होऊ शकतो.

उत्तराखंडमध्ये हवामान कोरडे राहणार

उत्तराखंडमध्ये २५ नोव्हेंबर रोजी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्यात पाऊस किंवा बर्फवृष्टीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, हवामान विभागाच्या सात दिवसांच्या अंदाजानुसार, ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये धुक्याचे प्रमाण वाढू शकते.

शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा विशेष सल्ला

मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. तामिळनाडूमध्ये भातशेतीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच काढणीस तयार असलेली पिके काढून सुरक्षित आणि कोरड्या ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागातील शेतकऱ्यांनाही शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. जोरदार वाऱ्यांची शक्यता असल्याने फळबागा आणि भाजीपाला पिकांना योग्य आधार देण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.